हिंगोली7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
हिंगोली शहरातील एनटीसी भागात असलेल्या निर्मल फूड प्रॉडक्ट्स या बेकरी मध्ये पाच लाख साठ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांवर शनिवारी ता. ९ दुपारी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोलीच्या शास्त्रीनगर भागातील व्यापारी श्याम नेणवाणी यांची एनटीसी भागामध्ये निर्मल फूड प्रॉडक्ट नावाची बेकरी आहे. या ठिकाणी अविनाश डोंगरदिवे चालक कोंडबा जाधव व सानप नावाची व्यक्ती काम करत होती. या तिघांनी संगणमत करून बेकरी मधील 67 हजार रुपयांचे गुलाबजामुन चे 112 बॉक्स, 70 हजार रुपये किमतीचे बर्फीचे 59 बॉक्स, एक लाख 12 हजार रुपये किमतीचे काजू टोस्ट चे 450 बॉक्स, 85 हजार रुपये किमतीचे सोनपापडीचे 178 बॉक्स तसेच 99 हजार रुपये किमतीचे सोनपापडी चे 55 मोठे बॉक्स अशा एकूण पाच लाख साठ हजार रुपयांचा खाद्यपदार्थाचे बॉक्स तारीख 1 सप्टेंबर 22 ते ता. ८ ऑगस्ट २३ या कालावधीत परस्पर विक्री केले.
अखेर प्रकरण हिंगोली ठाण्यात दाखल
दरम्यान याबाबत शंका आल्याने बेकरी मधील साहित्याची तपासणी केली असता त्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी श्याम नेणवाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील तिघांवर पाच लाख सात हजार रुपयांचा अपहार करून विश्वासघात केल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विकास पाटील उपनिरीक्षक पवार पुढील तपास करीत आहेत.