नियोजन: विभागीय आयुक्तांनी घेतली मान्सूनपूर्व आढावा बैठक; गोदाकाठच्या जिल्ह्यांनी अधिक सतर्कता बाळगावी‎- केंद्रेकर


छत्रपती संभाजीनगर‎17 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात गोदाकाठच्या जिल्ह्यांना‎ पुराचा फटका बसतो. त्यामुळे‎ गोदाकाठच्या जिल्ह्यांनी सतर्क राहावे.‎ तसेच मराठवाड्यातील जिल्हा‎ प्रशासनाच्या नियंत्रण कक्षासह आपत्ती‎ व्यवस्थापन यंत्रणा अधिकाधिक‎ अद्ययावत व सज्ज ठेवा, अशा सूचना‎ विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी‎ दिल्या आहेत.‎

Advertisement

या अधिकाऱ्यांची होती विशेष उपस्थिती

विभागीय आयुक्त कार्यालयातील‎ सभागृहात विभागीय आयुक्त केंद्रेकर‎ यांनी आज मराठवाडा विभागातील‎ आठही जिल्ह्यांच्या मान्सूनपूर्व‎ तयारीचा आढावा घेतला. या वेळी‎ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय,‎ मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा‎ परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी‎ विकास मीना, पोलिस अधीक्षक‎ (ग्रामीण) मनीष कलवानिया,‎ जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता‎ विजय घोगरे, प्रादेशिक जलसंधारण‎ अधिकारी वसंत गालफाडे,‎ महवितरणचे मुख्य अभियंता सचिन‎ तालेवार यांच्यासह विविध यंत्रणांचे‎ प्रमुख अधिकारी उपस्थित होते.‎ व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे आठही‎ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा‎ परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी‎ तसेच पोलिस अधीक्षक यांच्यासह‎ संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.‎

Advertisement

अद्ययावत यंत्रणा तयार ठेवण्याची दिली सूचना‎
केंद्रेकर म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनात सातत्याने संपर्क अत्यंत महत्त्वाचे आहे.‎ आपत्तीपूर्व नियोजन करताना यंत्रणा अद्ययावत असावी. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा‎ वापर व्हावा. माहिती देणारी साखळी तत्पर ठेवतानाच जिल्हा नियंत्रण कक्षाने सर्वदूर‎ संपर्कसातत्य ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही संदेशाला दुर्लक्षित करू नका, आपला‎ दूरध्वनी बंद राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.‎



Source link

Advertisement