नियुक्ती: जळगाव विभागात एसटीच्या 28 कर्मचाऱ्यांना बढती‎


जळगाव2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातील‎ २८ एसटी वाहकांसह इतर कर्मचाऱ्यांना लिपिकपदी‎ बढती देण्यात आली. ही नियुक्ती सेवा ज्येष्ठतेनुसार व‎ रिक्त जागांनुसार करण्यात आली. या सर्व कर्मचाऱ्यांना‎ विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र‎ देण्यात आले.‎ जळगाव विभागातील २८ एसटी कर्मचाऱ्यांना लिपिक‎ म्हणून बढती देण्यात आली. त्यात जळगाव आगारातील‎ पाच वाहक, पाचोरा आगारातील सहा वाहक,‎ चाळीसगाव, मुक्ताईनगर व भुसावळ आगारातील‎ प्रत्येकी तीन वाहक, रावेर आगाराचे दाेन वाहक, यावल,‎ जामनेर व अमळनेर आगाराचा प्रत्येकी एक वाहक, तर‎ भुसावळ आगाराचा एक शिपाई व आस्थापना शाखेच्या‎ एका शिपायाला बढती देण्यात आली. सर्व नवनियुक्त‎ लिपिकांनी विभाग नियंत्रक व विभागीय कर्मचारी वर्ग‎ अधिकारी प्रशांत महाजनांचा सत्कार केला.‎

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement