नियम तोडले: विधानसभा सदस्याचा स्टीकर लावून माजी आमदाराचा विदर्भात रुबाब; माजी आमदारांनी फेटाळली गोष्ट


वर्धा21 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

वर्धा‎ यवतमाळ जिल्ह्यातील‎ आर्णी-केळापूर विधानसभा‎ क्षेत्रातील माजी आमदार असूनही, ‎ आपल्या मालकीच्या वाहनावर ‎विधानसभा सदस्य लिहिलेले आणि राजमुद्रा असलेले स्टिकर लावून‎ वर्धा जिल्ह्यात तेलंगणा पार्टीचा‎ झेंडा घेऊन फेरफटका मारताना‎ दिसत आहेत.‎

Advertisement

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.‎ चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस‎ पक्षाने महाराष्ट्रात जोमाने काम‎ करण्यास सुरुवात केली आहे.‎ त्याच पक्षात आर्णी-केळापूर‎ मतदारसंघातील माजी आमदार‎ राजू तोडसाम यांनी प्रवेश घेतला.‎ पक्षाने त्यांच्याकडे वर्धा जिल्ह्याची‎ जबाबदारी दिली आहे.

जिल्ह्यातील‎ चारही विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक‎ गावांमध्ये प्रचार व प्रसा करण्यासाठी 24 मेपासून सुरुवात‎ करण्यात आली आहे. या‎ कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी‎ आयोजित पत्रकार परिषदेला माजी‎ आमदार राजू तोडसाम त्यांच्या‎ मालकीच्या महागड्या चारचाकी‎ वाहनाने आले.

Advertisement

विशेष म्हणजे‎ त्यांच्या वाहनाच्या समोरील‎ काचेवर चक्क विधानसभा सदस्य‎ व राजमुद्रा असलेले स्टिकर दिसून‎ आले. वास्तविक असे स्टिकर‎ फक्त विद्यमान‎ आमदारांना लावण्याचे अधिकार‎ आहेत, तरीसुध्दा माजी आमदार‎ ‎राजू तोडसाम हे वाहनावर स्टीकर‎ लावून सर्रास फिरत आहेत.‎

याबाबत तोडसाम यांना विचारले‎ असता, माझ्या मेव्हण्याचे वाहन‎ असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र‎ आरटीओ कार्यालयातील‎ अभिलेखावर पाहणी केली असता,‎ एमएच 29 एटी 0750 या क्रमांकाचे‎ वाहन त्यांच्या स्वत:च्या नावाने‎ दिसून आले. सोबतच वाहनावर‎ चारअंकी नंबर लिहिणे आवश्यक‎ असताना त्यांनी तीन अंकामध्ये‎ नंबर लिहून आरटीओ विभागाच्या‎ नियमांचे सुद्धा उल्लंघन केले आहे.‎

Advertisement



Source link

Advertisement