निकालानंतर निलेश राणेंचा हल्लाबोल: म्हणाले- अख्खी चिवसेना ओकत होती पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला


Advertisement

3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचा झेंडा फडकला असून 19 पैकी आतापर्यंत 11 जागा भाजपने जिंकल्याची माहिती आहेत. महाविकास आघाडीला फक्त 8 जागा मिळविता आल्या आहेत. त्यामुळे राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर आता निलेश राणे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे.

Advertisement

काय म्हणाले निलेश राणे?
अख्खी चिवसेना ओकत होती. पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला. कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल, असे वर्गणी चोरांना वाटत होते. पण ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरे करणाऱ्यालाच न्याय मिळतो”, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली.

Advertisement

दरम्यान, जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्षांसह दिग्गजांचा पराभव झाला असून, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा प्रतिष्ठेचा गड नारायण राणे यांनी जिंकला. यंदाची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणुकी इतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीपेक्षा वेगळी होती. संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला, नितेश राणे यांच्यावरील अटकसत्र, राणेंना कोर्टाने बेल नाकारली या सर्व घटनेवरून या निवडणुकीला वेगळे वळण लागले होते.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement