नाशिक मनपाकडे निधी नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे धाव: साधुग्रामसाठी भुसंपादनासाठी साडे चार हजार कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik Municipal Corporation Has No Funds, It Runs To The Chief Minister, The Proposal Of Four And A Half Thousand Crores For Land Acquisition For Sadhugram Is Courted By The Government; Administration Haste Four Years Ago

नाशिकएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सिंहस्थ कुंभमेळ्याला तब्बल चार वर्ष बाकी असताना आतापासून प्रशासनाने साधुग्रामच्या पावणे चारशे एकर जागा संपादनासाठी घाई सुरू केली असून या भुसंपादनासाठी तब्बल साडे हजार काेटी करण्याची एेपत नसल्यामुळे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दरवाजा ठाेठावण्यात आला आहे.

Advertisement

पालिकेमार्फत राज्याच्या नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठवला असून त्यात, कुंभमेळ्यासाठी नाशकात येणाºया लाखो साधु-मंहताकरीता तपोवनात उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामसह अन्य सुविधांच्या उभारणीसाठी भुसंपादन आवश्यक असल्याचा अभिप्राय दिला आहे. पालिकेची अर्थिक स्थिती नाजुक असून घरपट्टी, पाणीपट्टी, नगररचना शुल्क आटल्यामुळे भुसंपादन करणे शक्य नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा या पक्षाचे सरकार आल्यानंतर अचानक चार वर्षावर असलेल्या कुंभमेळ्याच्या जागा संपादनाला वेग दिला गेला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी सातत्याने पाठपूरावा केल्यामुळे तसेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही पालिकेला प्रस्ताव पाठवून साधुग्रामसाठी आरक्षित असलेली जागा, त्यापैकी संपादित जागा आणि उर्वरित संपादित करावयाच्या जागेबाबत अहवाल मागवला.

Advertisement

त्यानंतर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील महापािलकास्तरीय सिंहस्थ समन्वय समिती स्थापन करून अहवाल तयार केला गेला. पावणे चार एकर जागा संपादनासाठी रेडिरेकनरचा दर बघता रोखीत किती संपादनासाठी पैसे लागतील याचा अभ्यास केला गेला. त्यात, जवळपास सव्वाचार हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे स्पष्ट झाले हाेते.

54 एकर जागा ताब्यात; 13 एकरची प्रक्रिया सुरू..

Advertisement

सद्यस्थितीत तपोवनातील तब्बल 264 एकर जागेवर साधुग्रामचे आरक्षण असून 17 एकर जागा पार्कींग व अग्निशमन दलासाठी आरक्षित आहे. 54 एकर जागा पालिकेच्या ताब्यात आहे. सुमारे साडेतेरा एकर जागेच्या संपादनाची प्रक्रिया सद्यस्थितीत सुरू आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी महापालिकास्तरीय सिंहस्थ समन्वय समिती स्थापन झाली असून या समितीच्या दोन बैठकाही पार पडल्या आहेत. आता जिल्हास्तरीय समितीचे गठण करावे लागणार असल्याने त्यासंदर्भातील प्रस्ताव देखील शासनाला सादर करण्यात आला आहे. या समितीत जिल्ह्यातील आमदार, खासदार आदींचा समावेश असणार आहे.

शिंदे, फडणवीस, महाजन यांची भेट घेणार

Advertisement

आमदार राहुल ढिकले म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा प्रामुख्याने माझ्या नाशिक पुर्व विधानसभा मतदारसंघात हाेताे. त्यामुळे तेथील सर्व समस्या माहिती असून साधुग्रामची जागा कायमस्वरूपी ताब्यात घेणे गरजेचे आहे. अन्य सुविधांसाठी निधी मिळवण्याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाठपुरावा करणार.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement