नाशिक मध्ये शुभांगी पाटील यांना ‘मविआ’चा पाठिंबा: सत्यजित तांबेंवर निलंबनाची कारवाई, पाचही उमेदवारांची नावे जाहीर17 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्यात पाच विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने पाचही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात नासिक मध्ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. तसेच सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

Advertisement

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश तांबे यांनी उपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसच्या वतीने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आलेली असताना त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून काँग्रेसला धक्का दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर पाचही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

या उमेदवारांना पाठिंबा

Advertisement
  1. नागपूर शिक्षक मतदार संघातून सुधाकर अडबाले
  2. अमरावती विभागातून धीरज लिंगाडे
  3. औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून विक्रम काळे
  4. नाशिक पदवीधर मतदारसंघातून शुभांगी पाटील
  5. कोकण मध्ये बाळाराम पाटील

नाशिक पदवीधर मतदार संघामुळे चर्चा रंगली
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी उमेदवारी मागितली होती. पक्षाच्या भूमिके विरोधाच्या सत्यजित तांबे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न दाखल करता आपल्या पुत्राला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली होती. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर सत्यजित तांबे यांना देखील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

शुभांगी पाटील यांचे पारडे जड
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीनंतर शुभांगी पाटील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शुभांगी पाटील यांनी या आधी देखील शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शुभांगी पाटील यांचे पारडे जड झाले आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement