नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा: वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा शक्यता


मुंबई2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी संकट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Advertisement

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच शेतकऱ्यांचे पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा एकदा बळीराजाच्या संकटात भर पडणार असे चित्र निर्माण झाले.

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे निर्यातीवर निर्बंध आणले गेले आहेत. त्यातच अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. आता पुन्हा एकदा राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे.

Advertisement

गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यात हाहाकार उडवलाय. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रबीचे पीकही शेतकऱ्यांचा हातचे गेले आहे. 13 मार्चला या तीन जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याच,सोबत 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील असे सांगण्यात येते आहे.

संबंधित वृत्त वाचा

Advertisement

एकीकडे अवकाळी पावसाचे पंचनामे सुरू:दुसरीकडे राज्यातील 36 तहसीलदारांच्या बदल्या; विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

राज्यातील शेतकरी अवकाळी आणि गारपीट यामुळे त्रस्त आहे. यात अवकाळी पावसाचे पंचनामे सुरू असतानाच राज्यातील 36 तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या मुद्यावरुन देखील विरोधक आज सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Advertisement

राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे विधिमंडळात विरोधकांनी या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. वाचा सविस्तर

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement