नाशिक जि.प. प्रशासनाने केला टॅंकरमुक्त जिल्ह्याचा संकल्प: गावागावात बंधारे बांधत पाणी अडवून केली जाणार साठवणूक


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik District The Administration Decided To Make The District Free From Takers, The Water Will Be Stored By Building Dams In The Villages.

नाशिक9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ ही महत्वकांक्षी याेजना पंतप्रधानांनी हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक वाड्या वस्तीपर्यंत नळांव्दारे पाणी देण्यात येणार आहे. मात्र उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे टँकरची गरज भासू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावागावात बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी राेजगार हमी याेजनेतून दुष्काळी गावात सिमेंट बंधारे बांधून पाण्याची साठवणूक करण्यात येणार आहे.

Advertisement

सुरगाणा तालुक्याच्या सर्वागिण विकासासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याचे काम जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरू आहे. यात प्रामुख्याने ठराविक गावांना पाणी नसल्याने टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असल्याचे समोर आले. सुरगाणा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होऊनही या गावांची तहान टँकरव्दारे भागवावी लागते. पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागते. यात महिला वर्गाचे प्रचंड हाल होतात.

यासाठी जिल्हा परीषदेच्या मख्यकार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी टँकर मुक्तीचा संकल्प केला असून त्याबाबतचा सुक्ष्म आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून यंदा मुनष्य प्रधान कामे मोठ्या प्रमाणाावर घेतली जाणार आहेत. 60 टक्के अकुशल व 40 टक्के कुशल कामे करुन पावसाचे पाणी अडविले जाणार आहे. कामे जास्त व निधी कमी असला तरी पेठ, सुरगाणा, त्रंबक इगतपुरी या तालुक्यातील गावांमध्ये तलाव, दगडी बांध, पाणंद रस्ते, वैयक्तिक लाभातुन बंधाऱ्याच्या योजनांची कामे केली जाणार आहे. तीस मीटर पर्यंतचे बंधारे या काळात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement