नाशिक31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर तालुका बुद्धिबळ संघटनेच्या वतीने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण जिल्हाभरातून 60 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले हाेते. या स्पर्धेत होरायझन इंटरनॅशनल अॅकॅडमी, अश्विन नगर शाळेचा विद्यार्थी आदित्य पालखेडे याने 14 वर्षाखालील गटात 5 पैकी 4 गुण मिळवत 14 वर्षांखालील गटात पहिले स्थान मिळविले. या कामगिरीच्या आधारावर त्याचे या स्पर्धेच्या चेसची चॅम्पियनशिप पटकाविली. आदित्यला पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
बुद्धिबळ स्पर्धेतील उल्लेखनीय विजयाबद्दल होरायझन इंटरनॅशनल अॅकॅडमीच्या प्राचार्या रिचा पेखळे यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. होरायझन इंटरनॅशनल अॅकॅडमीचे बुद्धिबळ प्रशिक्षक पुष्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्यला प्रशिक्षण दिले जात आहे. या स्पर्धेत आदित्यनते आपल्या लाैलिका प्रमाणे कामगिरी करत विजेतेपदकावर आपले नाव काेरले. अंत्यत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सर्व स्पर्धकांना मात देत आदित्यने आपली चुणूक दाखवून दिली. याच कामगिरीच्या जाेरावर चॅॅम्पियनशीप आपल्या नावावर करत शहरासह शाळेचे नाव त्याने उंचावले आहे.
दरम्यान आगामी स्पर्धेची देखील तयारी आतापासून त्याने सुरु केली असून त्यातही यशाची परंपरा कामय ठेवत ताे विजेता ठरेल अशी अपेक्षा प्रशिक्षकासह शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. या यशाबद्दल त्यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल,चिटणीस दिलीप दळवी, संचालक मंडळ,शिक्षणाधिकारी डॉ संजय पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी, खेळांडूनी यांनी अभिनंदन केले आहे.