नाशिकसाठी महत्वाची बातमी: स्मार्ट सिटीतर्फे रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक मार्गात बदल, काही मार्गावर प्रवेश बंद


नाशिक5 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

स्मार्ट सीटीअंतर्गत शहरात विविध कामे सुरु असून शहरातील मध्यवर्ती परिसराराती रस्ते खोदण्यात येणार असल्याने तरण तलाव ते राजीव गांधी भवन ते पोलिस लाईन जलकुंभ पर्यंत भुमीगत विद्युत्त वाहिका मलजलवाहिका पिण्याचे पाईपलाईन करण्यात येणार आहे. या रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे. वाहतूक विभागाकडून उशिरा का होईन शहरवासियांना या अधिसूचनेद्वारे अवगत करण्यात आले. 60 दिवसांकरीता ही अधिसूचना लागू राहणार आहे.

Advertisement

तरण तलाव ते राजीव गांधी भवन चौक, राजीव गांधी भवन चौक ते पोलिस लाईन जलकुंभ जाणारी एकेरी वाहतुक त्याच मार्गाने सुरु राहिल काम सुरु असतांना वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये याकरीता या मार्गावरील वाहनांकरीता पर्यायी मार्ग- जल तरण तलाव ते मोडक सिग्नल, सिबिल सिग्नल, जुना सीटीसीत सिग्नल ते कॅनडा काॅर्नर, जुना गंगापुरी नाका, अशोक स्तंभ, सीबीएसई सिग्नल, भवानी सर्कल, आंबेडकर चौक, कुलकर्णी गार्डन, राणे डेअरी, मॅरेथाॅन चौक, अशोक स्तंभ या रस्त्यावर दोन्ही बाजुला नो पार्किंग झोन असणार आहे.

महानगर पालिका स्मार्ट सीटी प्रशासनालाही नियमांचे पालन करण्याच्या सुचना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. धात्रकद काॅर्नर ते हाॅटेल पंचवटी – तरण तलाव येथे बॅरेकेटींग पाॅईंट राजीव गांधी भवन चौक बॅरेकेटींग पाईंट या मार्गावर रात्रीच्या वेळी तरण तलाव ते राजीव गांधी भवन चौक ते पोलिस लाईन जलकुंभ कामाच्या ठिकाणी बॅरेकेटींग करुन रात्रीच्या वेळी वाहनांना दिसेल असे प्रवेश बंद नो पार्किंग चे रेडीअम बोर्ड बिल्कर्स लावणे, वाहतुक पोलिसांच्या मदतीकरीता 4 ट्राफिक वाॅर्डन यांची नियुक्ती करणे, वेळोवेळी वाहतुक विभागाला रिपोर्ट करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement

अपघात घडल्यास संबधित कंपनी जबाबदार

रस्ते कामाच्या ठिकाणी अपघात घडल्यास संबधित कंपनीला जबाबदार धरण्यात येणार आहे. अपघात रोखण्सासाठी संबधित कंपनीकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने पोलिस प्रशासनाकडून संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement