नाशिक17 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शहरात स्ट्रीट क्राईच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याचे दिसून येत असून शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डन येथे उभ्या असलेल्या दोन ते तीन कारवर कोयता मारुन कारचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे ही घटना ताजी असतांना रात्री दहीपुल परिसरात दोघांनी हातगाडी व्यावसायिकांकडे हाफ्ते मागत दुकानांची तोडफोड केली. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पोलिस कर्मचारी योगेश अहिवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री कुलकर्णी गार्डन येथे एका संशयिताने हातात कोयता घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. संशयिताने दुकानदारांना कोयता दाखवल्याने व्यावसायीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.संशयिताने हातातील कोयता गार्डनच्या जवळ पार्किंग केलेल्या तीन कारवर मारुन काचा फोडल्या. व्यावसायिकांनी पोलिसांना कळवले. काही वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संशयिताला ताब्यात घेतले चौकशीत अशोक बंडु पुंजारे रा. कामगारनगर सातपूर असे नाव सांगीतले. संशयिताच्या विरोधात शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
दहीपुल परिसरात दोन गटामध्ये हातगाडी व्यावसायिकांसह दुकानदारांकडून हफ्ते वसुलीच्या कारणातून झालेल्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. दुकाने फोडल्यानंतर दुकाने बंद करण्यात आली भद्रकाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने तपास करत संशयित सुशील मनोहर गायकवाड उर्फ यमराज रा. पंचवटी, ऋषीकेश किरण खैरे रा. जुने नाशिक या दोघांना अटक केली. वरिष्ठ निरिक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
शहरात स्ट्रीट क्राईच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याचे दिसून येत असून शरणपुर रोडवरील कुलकर्णी गार्डन येथे उभ्या असलेल्या दोन ते तीन कारवर कोयता मारुन कारचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे ही घटना ताजी असतांना रात्री दहीपुल परिसरात दोघांनी हातगाडी व्यावसायीकांकडे हाफ्ते मागत दुकानांची तोडफोड केली. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पोलिस कर्मचारी योगेश अहिवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री कुलकर्णी गार्डन येथे एका संशयिताने हातात कोयता घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. संशयिताने दुकानदारांना कोयता दाखवल्याने व्यावसायीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.संशयिताने हातातील कोयता गार्डनच्या जवळ पार्किंग केलेल्या तीन कारवर मारुन काचा फोडल्या. व्यावसायीकांनी पोलिसांना कळवले. काही वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संशयिताला ताब्यात घेतले चौकशीत अशोक बंडु पुंजारे रा. कामगारनगर सातपूर असे नाव सांगीतले. संशयिताच्या विरोधात शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
दहीपुल परिसरात दोन गटामध्ये हातगाडी व्यावसायिकांसह दुकानदारांकडून हफ्ते वसुलीच्या कारणातून झालेल्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. दुकाने फोडल्यानंतर दुकाने बंद करण्यात आली भद्रकाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने तपास करत संशयित सुशील मनोहर गायकवाड उर्फ यमराज रा. पंचवटी, ऋषीकेश किरण खैरे रा. जुने नाशिक या दोघांना अटक केली. वरिष्ठ निरिक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
शहरात स्ट्रीट क्राईमच्या गुन्ह्यात वाढ
शहरात स्ट्रीट क्राईच्या गुन्ह्यात वाढ झाली असल्याचे घडणाऱ्या घटनांतून निदर्शनास येत आहे. हातगाडी लावण्यासाठी हफ्ते घेतले जात असल्याचा आरोप व्यावसायीकांनी केला आहे. यापुर्वी मेनरोड परिसरात हातगाडी व्यावसायीकांच्या दोन गटात दंगल झाली होती. पुढे या घटना गंभीर गुन्ह्यात रुपांतर होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वेळीच संशयितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे.
शहरात स्ट्रीट क्राईच्या गुन्ह्यात वाढ झाली असल्याचे घडणाऱ्या घटनांतून निदर्शनास येत आहे. हातगाडी लावण्यासाठी हफ्ते घेतले जात असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. यापूर्वी मेनरोड परिसरात हातगाडी व्यावसायिकांच्या दोन गटात दंगल झाली होती. पुढे या घटना गंभीर गुन्ह्यात रुपांतर होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वेळीच संशयितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे.