नाशिकमध्ये पुन्हा बस पेटली: सुदैवाने जीवित हानी टळली; मालेगाव – नाशिक महामार्गावरील घटना


नाशिक43 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात अग्नितांडव सुरुच आहे. बुधवारी दि. 10 चांदवडच्या घाटात एसटी महामंडळाच्या एका बसने अचानक पेट घेतला. बसला आग लागल्याचे कळतात सर्व प्रवासी तातडीने बसच्या खाली उतरल्याने सुदैवाने जिवित हानी टळली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एसटी बस पेट घेण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने बसच्या मेंटेन्सचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement

एसटी महामंडळाची बस मालेगाव येथून नाशिककडे येत हाेती. दुपारी 1 वाजेच्या सुमारास चांदवड घाट परिसरात बस येत असतांना इंजिनमधून धुर येत असल्याचे चालकांच्या लक्षात आले. त्याने बस थांबवत तातडीने सर्व प्रवाशांना खाली उतरवले.आग लागल्याच्या काही क्षणात एखाद्या कागदाप्रमाणे बस राख झाली. मोठमोठ्या आगीच्या ज्वालांनी बसला गिळून घेतले आणि मोठ मोठे धुराचे लोट वर फेकले जात होते. ही आग खूप भीषण होती. प्रवासी तत्काळ खाली उतरले नसते तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दरम्यान बसला लागलेली आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक विभागाच्या लोकांनी प्रयत्न केली त्यानंतर कुठे आगीवर नियंत्रण मिळवता आहे. मात्र बसथाेड्याच वेळेत बसला आग लागल्याचे बसची पुढची बाजु जळून पूर्ण खाक झाली.एसटी बसला आग लागल्याने या या मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी थांबविण्यात आली हाेती.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या बसेस पेट घेत असल्याचा घटना वाढू लागल्याने एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवासांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

एसटीचा प्रवास बनला असुरक्षित

Advertisement

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास हा असुरक्षित बनला आहे.सातत्याने अपघात, बसपेटणाच्या घटना यास कारणीभुत ठरत आहे. याबाबत एसटीच्या बस देखभाल व दुरुस्तीचे ऑडीट करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement