नाशकात होणार इलेक्ट्रॉनिक क्लस्टर: उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा, रोजगार वाढीसाठी होणार मदत


प्रतिनिधी | नाशिक36 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्यातील दुसरे इलेक्ट्रॉनिक क्लस्टर नाशिकमध्ये उभारण्याची महत्त्वपूर्ण घाेषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. या क्लस्टरकरिता एमअायडीसीकडे जागांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी उद्योजकांसोबत बैठक घेऊन जागा निश्चित करावी. तसेच स्थानिक माेठ्या उद्याेगांनी या क्लस्टरकरिता अँकर इंडस्ट्री म्हणून पुढाकार घ्यावा, असे अावाहनही सामंत यांनी केले.
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या (निमा) वतीने आयोजित ‘निमा पॉवर २०२३’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी सामंत बोलत होते.
इलेक्ट्रॉनिक क्लस्टर मंजुरीसोबतच दिंडोरी, घोटी या ठिकाणीसुद्धा एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी स्थानिक उद्योजकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असून इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमुळे जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्योग रोजगारनिर्मिती योजनेतून मागील सहा महिन्यांत १२,३६० तयार झाले असून या वर्षभरात २५ हजार उद्योजक निर्मितीचे उद्दिष्ट आहे.
ऑक्टोबरमध्ये जाहीर झाले पहिले क्लस्टर पुण्याजवळ
केंद्र सरकारने यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात पुण्याजवळ रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मंजुरी दिली होती. या क्लस्टरमध्ये २ हजार कोटींची गुंतवणूक येणार आहे. या प्रकल्पातून ५ हजार रोजगार निर्मिती होईल, असा दावा केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केला होता. २९७ एकर जागेवर हे क्लस्टर साकारणार असून त्यासाठी ४९२ कोटी खर्च होणार आहे. त्यातील २०७ कोटी केंद्र सरकार देणार आहे.Source link

Advertisement