नाशकातील अंबड परिसरात वीज कंपनीकडून अघाेषित भारनियम: नागरिकांमध्ये संताप, वीज कंपनीविराेधात करणार आंदोलन


नाशिक5 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

एकीकडे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असताना, दुसरीकडे वीज कंपनीच्या मनमानी कारभाराचा वीज ग्राहकांना फटका बसत असून काेणत्याही वेळेला विना सुचना अंबड, सिडकाे परिसरात भारनियमन हाेत आहे. वीज कधीही येते आणि कधीही खंडित होते. याप्रकाराने रहिवाशी संतप्त झाले असून वीज कंपनीविराेधात आंदाेलनाच्या तयारीत आहेत.

Advertisement

सिडको, अंबड, पाथर्डी फाटा या संपूर्ण भागात वीज कंपनीचा भोंगळ कारभार सुरू आहे. या भागात भार नियमन कधी असते? याची माहिती नागरिकांना मिळत नाही. तर वीज खंडित होते आणि कधीही येते याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे. वीज पुरवठा पुर्ववत कधी हाेणार ? याबाबत संबंधित अधिकाऱ्यानां विचारल्यास त्यांच्याकडून याेग्य उत्तरे मिळत नाही. अनेक वेळा हे कर्मचारी व अधिकारी नागरिकांचे फोनच उचलत नसल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अन्यथा आंदाेलन करावे लागेल असा इशाराच स्थानिकांनी दिला.

बील वितरणातही गाेंधळ

Advertisement

पाथर्डी फाटा भागात वीज बिल वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेगळाच अनुभव नागरिक घेत आहेत. कुणाचेही बिल कुणालाही दिले जात आहे. योग्य पत्ता न पाहता वाटेल तिथे वीज बिले टाकून दिली जात असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच, ग्राहकांना वीज बील भण्यास १५ दिवसांचा विलंब झाला तरी लागलीच वीजपुरवठा खंडित केल्याची कारवाई होते. मात्र वीज बिले कमी करण्यासाठी ग्राहकांना वारंवार वीज कंपनीचे कार्यालयात उंबरे झिजवावे लागत आहे. अनेक ठिकाणी मीटर रिडींग न करता भरमसाठ बिले दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

अंबड भागात विजेचा खेळखंडोबा

Advertisement

अंबड, महालक्ष्मी नगर परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडत हाेत असल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांना माेठा फटका बसून नुकसान साेसावे लागत आहे. अधिकाऱ्यांची वारंवार संपर्क साधूनही माहिती मिळत नाही.

– दीपक दातीर, माजी नगरसेवक

Advertisement

वीज बंद करतात

अंबड, मोरे मळा भागात विद्युत कर्मचारी हे बांधकाम व्यवसायिकांसाठी वारंवार वीज बंद करतात. याचा त्रास इतर नागरिकांना सहन करावा लागतो. हा वीजपुरवठा पाच – पाच तास खंडित केला जाताे.

Advertisement

– सचिन महाजन

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement