छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
शहर महावितरण प्रशासनाने गुरुवारी नारेगावात वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी ग्राहक मेळावा घेतला. मेळाव्यात ग्राहकांनी नियमित वीजबिल भरूनही वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले. यावर मात करण्यासाठी उच्च क्षमतेची डिपी द्यावी. विद्युत खांब व एअर बंच केबल टकावे, अशी आग्रही मागणी केली. तर अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी पहिले थकीत वीजबिल भरावे. त्यानंतर तुमच्या विजेच्या सर्व समस्या आम्ही सोडवण्याची ग्वाही दिली.
प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या निर्देशानुसार मंगळवारी (25 मे) नारेगावात ग्राहक संवाद मेळावा घेण्यात आला. जमधडे यांच्यासह शहर-2 विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबेकर, चिकलठाणा उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश तौर, आदी अधिकारी व जनमित्र, ग्राहक प्रतिनिधी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळावा सुरू होताच ग्राहकांनी वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबात अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच जास्तीच्या वीजबिल का येत आहेत. आमच्या समस्या कुणीच एकुण घेत नसल्याची कैफित मांडली. वीज खांब बसवावेत, शाखा कार्यालयात तक्रारवही ठेवावी, वाढती ग्राहक संख्या पाहता आणखी एक शाखा कार्यालय सुरू करावे, नवीन रोहित्र बसवावेत, वीजबिल दुरुस्त करावे, एरियल बंच केबल टाकावी, पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांना लागणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशा विविध मागण्या ग्राहकांनी केल्या.
यावर अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. एमआयडीसी शाखेसाठी अतिरिक्त कर्मचारी नेमले असून अनावश्यक वीजवापर टाळावा. वीज खंडितची तक्रार करताना वीजबिल भरलेले असावे. त्याचबरोबर नवीन रोहित्रासाठी नवीन जोडणीचे अर्ज जोडावेत. ग्राहकांनी वीजबिले नियमित भरावीत. वीजचोरी करू नये आणि कुणी वीजचोरी करत असेल तर त्यांची माहिती महावितरणला द्यावी, असेही आवाहन केले.