‘नारायण फार त्रास आहे’..!: राणेंनी सांगितली बाळासाहेबांची खंत, म्हणाले – ‘त्यांना कुणी त्रास दिला वेळ आल्यानंतर सांगेल’मुंबई2 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

”बाळासाहेब वडीलांसारखे होते अनेकजण म्हणतात. पण मुलांसारखे कितीजण वागले हा एक प्रश्न आहे. सर्व गोष्टी आम्ही जवळून पाहील्या. त्यांना मानसिक त्रास महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी दिला नाही. तर तो कुणी दिला याचा विचार करा. मी तेव्हा जायचो बसायचो. साहेब म्हणायचे नारायण फार त्रास आहे. साहेबांनी जे सांगितले ते मी येथे नाही सांगू शकत. वेळ आली तर सांगेल.” असा गोप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केला.

Advertisement

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्राचे अनावरण विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आज झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तैलचित्राचे अनावरण केले. या कार्यक्रमात राणे बोलत होते.

बाळासाहेब आज प्रत्यक्ष हवे होते

Advertisement

नारायण राणे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र विधानभवनात लागताना अतिशय आनंद वाटत आहे. हे तैलचित्र लागताना असे वाटते की, बाळासाहेब आज तुम्ही प्रत्यक्ष हवे होते. तुमचे दर्शन हवे होते. काही नको तुम्ही पुष्कळ दिले फक्त तुमचे दर्शन हवे. साहेब साहेब होते त्यांची बरोबरीला कुणीच नाही. कसली पदं, काय पदं आम्ही पाहीलीय.

मी बाळासाहेबांमुळेच मोठा – नारायण राणे

Advertisement

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, शिवसेनेच्या सुरुवातीला 1966 ला होते. त्यावेळी भुजबळ होते त्यामुळे मी भुजबळांचेही नाव घेतले. हा क्षण माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण नाही. ते जाणे आमच्यासाठी दुर्दैवी आहेत. मला आजही वाटते बाळासाहेब ठाकरे हवे होते. माझ्या आयुष्यात कुणीच नव्हते. मी मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचा मुलगा मुंबईत शिक्षणासाठी आलो. शिवसेनेचा जन्म झाला त्यावेळी आम्ही शिवसेनेचे सभासद झालो. त्यानंतर आज मी जो काही आहे, तो बाळासाहेब ठाकरेंमुळे. मला त्यांनी अनेक पदे दिले.

बाळासाहेबांचे आम्हाला वेड होते

Advertisement

नारायण राणे म्हणाले, शिवसेनेची मुंबईतील कोणतीही सभा मी सोडली नाही. बाळासाहेबांचे आम्हाला वेड होते. आताच्या शिवसैनिकांबद्दल मी बोलणार नाही. ते धगधगता निखारा होता. एक दोन नव्हे तर चाळीस वर्षे मी त्यांच्या सानिध्यात होतो. मी तेव्हा इनकम टॅक्समध्ये नोकरीला होतो पण बाळासाहेबांनी डाकेसाहेबांमार्फत शाखाप्रमुखपद घ्यायचे सांगितले.

मला मुख्यमंत्री केले

Advertisement

नारायण राणे म्हणाले, मला बाळासाहेबांनी खूप दिले. मला मुख्यमंत्री केले, साक्षीदार राज ठाकरे, स्मिता ठाकरे आहेत. अनेक नेत्यांना डावलले पण मलाच मुख्यमंत्री केले. मध्ये येणारे मांजरीसारखेच होते. बाळासाहेबांना शेवटच्या काळात मानसिक त्रास झाला. आईवडीलांपेक्षा त्यांनी माझी काळजी घेतली. ते एकमेव नेतृत्व आहे.

तेव्हा बस्तीस केसेस होत्या

Advertisement

नारायण राणे म्हणाले, आमच्यासारखे शिवसैनिक एकनाथ शिंदेंसारखे शिवसैनिक आम्ही संसार नाही पाहीला. घरात मी मोठा होतो. माझ्यामागे पाच भावडांचे काय होईल, उद्या काय होईल याचा विचार केला नाही. नगरसेवक म्हणून फार्म भरायला गेलो. वकीलांनी केसेस विचारल्या, तेव्हा बत्तीस केस होत्या. नारायण राणेंनी पैसे मिळवण्यासाठी केसेस नाही केल्या. साहेबांविरोधात कुणी बोलले तर अद्दल घडलीच समजा आता काही बोला काही करा, काहीच होत नाही. आहेत कोण होणारे ते गेले राहीले कोण?

मी त्यांचे ऋण फेडू शकत नाही

Advertisement

मी थांबणार नाही असो मी पाहिलेले बाळासाहेब आणि त्या बाळासाहेबांनी आमची जडण-घडण केली. त्यांचे या जन्मी मी ऋण फेडू शकत नाही असे मला स्वतःला वाटते. काही लोकांना माझे गोड शब्द ऐकायला कडू वाटतात त्यामुळे मी भाषण थांबवतो.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement