नारायण-नागबली पूजेसाठी दुमजली इमारत: त्र्यंबकेश्वरमध्ये 24 काेटींतून यात्रा सुविधा केंद्र, दुमजली पार्किंग, कुंडांचे साैंदर्यीकरण‎


संजय भड | नाशिक6 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

दाेन महिन्यांत काम पूर्ण हाेणार; भाविकांत समाधान‎

नाशिक‎ पर्यटन व धार्मिकस्थळ असलेल्या‎ त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राचा विकास‎ करण्यात येत असून २४ काेटींच्या‎ निधीतून यात्रा सुविधा केंंद्रासह‎ दुमजली पार्किंग, कुंडांचे‎ साैंदर्यीकरण आदी कामे‎ प्रगतीपथावर आहेत.‎

Advertisement

तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून पर्यटन‎ वाढावे, तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण‎ विकास व्हावा, जीर्ण पुरातन‎ मंदिरांचा जीर्णोद्धार व्हावा व त्यांचे‎ पुरातत्व जपावे या सद‌्हेतूने केंद्र‎ सरकारने २०१६ मध्ये प्रसाद याेजना‎ जाहीर केली. या याेजनेत‎ भारतातील आठ तीर्थक्षेत्रांचा‎ समावेश असून महाराष्ट्रातील‎ एकमेव तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरचा‎ समावेश आहे. २४ काेटींच्या‎ मिळालेल्या निधीतून‎ त्र्यंबकेश्वरमध्ये बहुमजली कार‎ पार्किंग, तलाव-कुंड यांचे‎ सुशाेभीकरण, भाविकांसाठी‎ प्रसादालय यासारखी कामे पहिल्या‎ टप्प्यात हाती घेतली गेली हाेती, ही‎ कामे दाेन महिन्यांत पूर्णत्वास जाणार‎ असून भाविकांना याचा लाभ‎ लवकरच मिळू शकणार आहे.‎

Advertisement

त्र्यंबकेश्वरचा विकास‎ करण्यासाठी प्रसाद याेजनेतून‎ शहरात यात्रा सुविधा केंद्राची‎ उभारणी पूर्णत्वास येत असून येथे‎ भाविकांसाठी कॅन्टींन, फूड काेर्ट,‎ अॅम्फिथिएटर असेल.‎ चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब‎ फाळके यांच्या जीवनचरित्राची‎ माहिती देणारी प्रदर्शनही असेल.

‎दिव्य मराठी‎ एक्सक्लुझिव्ह

Advertisement

‎प्रकल्पांचे काम दीड महिन्यात काम पूर्ण हाेणार‎ ‎ यात्रा सुविधा केंद्र, पार्किंग इमारत अाणि‎ ‎ नारायण नागबली पूजा इमारत हे तिन्ही प्रकल्प‎ ‎ दीड महिन्यात पूर्ण हाेतील तर तलावांच्या‎ ‎ सुशाेभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या‎ ‎ टप्प्यातील संत निवृत्तिनाथ महाराज समाधी‎ ‎ मंदिराची कामे सहा महिन्यांत पूर्ण हाेणार आहे.‎ – महेश बागूल , शाखा अभियंता, पर्यटन विभाग

‎१६० कार पार्किंग क्षमतेचे दुमजली पार्किंग

Advertisement

तीर्थक्षेत्र असल्याने येथे देशभरातून दिवसभरात सरासरी १० हजार‎ भाविक दर्शनासाठी येत असतात, याव्यतिरिक्त‎ नारायण-नागबलीसारख्या पूजेसाठी ही तितकेच लाेक महिनाभरात‎ येथे येतात. यामुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न लक्षात घेत, दुमजली‎ पार्किंग येथे उभारण्यात आले असून १६० कार पार्क करता येतील.‎यात्रा सुविधा केंद्राचे अंतीम टप्प्यात आलेले काम‎भाविकांच्या साेईसाठी सुविधा केंद्रात विविध साहित्य उपलब्ध‎ करून दिले जाईल. यात भाविकांना त्र्यबंक नगरीतील विविध ठिकाणे‎ याची माहिती मिळेल. तेथे स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.‎ ते भाविकांच्या विविध अडचणी साेडवतील.‎निवृत्तिनाथ महाराज मंदिरात नव्या सुविधा‎ या याेजनेच्या दुसऱ्या टप्प्यात संत निवृत्तिनाथ महाराज‎ समाधी मंदिरासाठी नव्या सुविधा उभारल्या जात आहेत,‎ तीन हजार भाविक उभे राहू शकतील असा सभामंडप,‎ दर्शनबारीे, प्रशासकीय इमारत आणि पुजाऱ्यांकरिता‎ क्वाॅर्टर्स उभारले जात आहेत.‎..या तीर्थक्षेत्रांचा प्रसाद याेजनेत समावेश‎ सोरटी सोमनाथ, जम्मू-काश्मीरमधील हजरतबल,‎ झारखंडमधील देवघर, मध्य प्रदेशातील उज्जैन, महाराष्ट्रातील‎ त्र्यंबकेश्वर, उत्तर प्रदेशातील अयोध्या, पश्चिम बंगालमधील‎ बेलूर ही आठ तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी निवडली आहेत.‎



Source link

Advertisement