नामांकित गोयल बिल्डरला 15 कोटींची खंडणी मागणी: न्यायालय आदेशाने 5 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

नामांकित गोयल बिल्डरला 15 कोटींची खंडणी मागणी: न्यायालय आदेशाने 5 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल


पुणे10 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

बनावट कागदपत्रांच्या वापर करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देवून कोट्यावधी रुपयांची वसूली करण्यासाठी नामांकित एआरव्ही गोयल बिल्डर विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या आणि ब्लॅकमेल करत तब्बल 15 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

कोर्टाच्या आदेशानुसार तक्रारदार राहुल प्रेमप्रकाश गोयल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुणाल शंकर मासाळ, अनिता शंकर मासाळ, चैताली शंकर मासाळ, तेजस शंकर मासाळ यांच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात भादवि कलम 420, 465, 468, 471, 388, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.हा प्रकार 29 डिसेंबर 2013 ते जून 2023 दरम्यान हवेली तालुक्यातील पिसोळी (Pisoli) येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसोळी सदनिका प्रकल्पात बांधकाम व्यावसायिक राहुल गोयल व मासाळ कुटूंबिय यांच्यात जागेबाबत करार झाला होता. गोयल बिल्डर यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प सुरू असल्यामुळे पिसोळी येथील जमिनीला मोठा बाजारभाव आले. यावेळी ठरविण्यात आलेल्या कायदेशीर करारनाम्यावरून ठरवलेला मोबदला कमी वाटू लागल्याने अधिक पैश्याच्या मोहासाठी मासाळ यांनी बांधकाम व्यवसायिक विरोधात खोट्या कागदपत्रांच्या आधारे चार कोटी रुपये घेऊन खंडणी स्वरूपात 15 कोटी रक्कम मागण्यास सुरुवात केली.

Advertisement

याच दरम्यान एकाने मासाळ यांच्या माध्यमातून कोर्टापुढे बनावट कागदपत्रे सादर करून कोर्टाची दिशाभूल करत गोयल यांच्याविरुध्द फसवणूकीचा दाखल केला होता.त्यामुळे झालेल्या अन्यायाविरुध्द राहुल गोयल यांनी न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. यावरून न्यायालयाने कागदपत्रांचे अवलोकन करून आरोपींविरुध्द फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.



Source link

Advertisement