नापिकीमुळे हात ऊसने पैसे कसे फेडावे याची होती चिंता: रामेश्‍वर तांड्यावरील शेतकऱ्याची विषप्राशन पिऊन आत्महत्या

नापिकीमुळे हात ऊसने पैसे कसे फेडावे याची होती चिंता: रामेश्‍वर तांड्यावरील शेतकऱ्याची विषप्राशन पिऊन आत्महत्या


हिंगोली30 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील रामेश्‍वरतांडा येथील शेतकऱ्याने नापिकीमुळे राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ७ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अर्जून परसराम जाधव (50, रा. रामेश्‍वरतांडा) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील रामेश्‍वरतांडा येथील शेतकरी अर्जून परसराम जाधव (50) यांना रामेश्‍वरतांडा शिवारात शेत आहे. तीन भावांमध्ये मिळून 10 एकर शेत असून या शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. यावर्षी पेरणी नंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मागील 20 ते 22 दिवसांपासून पाऊसच नसल्याने लागवडीचा खर्च निघणार की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे अर्जून जाधव हे मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते.

दरम्यान, मंगळवारी (ता.5) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांनी नापिकीमुळे तसेच हात ऊसने घेतलेले पैसे कसे फेडावे या चिंतेमध्ये राहत्या घरी विषारी औषध पिले. सदर प्रकार त्यांच्या कुटुंबियांना लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी वारंगाफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भावना जाधव यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार आर. एस. घोंगडे पुढील तपास करीत आहेत.

Advertisement



Source link

Advertisement