नातवाने विचारले, ‘नानी माँ आईचा मृतदेह अजून का मिळाला नाही?: मेहरून्नीसा खान यांची सनाचा मृतदेह शोधण्याची मागणी

नातवाने विचारले, ‘नानी माँ आईचा मृतदेह अजून का मिळाला नाही?: मेहरून्नीसा खान यांची सनाचा मृतदेह शोधण्याची मागणी


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • The Grandson Asked, ‘Why Hasn’t The Body Of Nani Maa Ai Been Found Yet? | BJP Worker Sana Khan Murder Case Sana Khan Mother Questions To Police

नागपूर6 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आज 27 दिवस होऊनही माझ्या मुलीचा मृतदेह मिळालेला नाही. “नानी माँ आईचा मृतदेह अजून का मिळाला नाही?’ असे माझ्या नातवाने मला विचारले. सांगा काय उत्तर देऊ असा भावूक प्रश्न सना खान यांची आई मेहरून्नीसा खान यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला. यातील मुख्य आरोपी अमित शाहु पोलिसांची दिशाभूल करीत आहे. मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या मुलीचा मृतदेह हवा आहे, असे मेहरून्नीसा म्हणाल्या.

Advertisement

या प्रकरणातील आरोपींचा पीसीआर संपल्याने ते न्यायालयीन कोठडीत आहे. या संदर्भात डीसीपी राहुल मदने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात येईल असे सांगितले. सना खान यांचा मृतदेह शोधण्यासाठी नागपूर पोलिसांच्या दोन टिम जबलपुरला तळ ठोकून आहे. नदीकाठच्या गावात शोध सुरू आहे. भाजपा नेत्यांची नावे आल्याने पोलिस प्रकरण दडपीत असल्याचा आरोप आणि चर्चा मदने यांनी साफ फेटाळून लावला. नागपूर पोलिस आपल्या परीने प्रयत्न करीतच आहे. लवकरच आम्हाला यश येईल, असे मदने यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या सना खान यांचे हत्याकांड आणि अश्लील चित्रफीत प्रकरणात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील राजकीय क्षेत्रातील मोठमोठ्या नेत्यांची नावे समोर येत आहेत. नुकतेच नागपूर पोलिसांनी नरसिंगपूरचे पूर्वाश्रमीचे भाजपाचे आणि सध्या काँग्रेसवासी झालेले आमदार संजय शर्मा यांना नोटीस दिली होती. ते नागपुरात येऊन चौकशीला सामोरे गेले. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे शर्मा यांनी सांगितले.

Advertisement

2ऑगस्टला सकाळी सना यांची हत्या केल्यानंतर अमित शाहुने त्यांच्या पर्समधून काढलेले तीन मोबाइल विश्वासू असलेल्या धमेंद्र यादवला दिले. धमेंद्रने तिन्ही मोबाइलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी खास असलेल्या कमलेशकडे सोपविली होती. धर्मेंद्रच्या अटकेनंतर पोलिसांनी मोबाइलबाबत विचारणा केली असता कमलेशचे नाव समोर आले. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी कमलेशला ताब्यात घेऊन चौकशी केली. जबलपूरमधील मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ एक मोबाइल लपविला असून अन्य दोन मोबाइल नर्मदा नदीत फेकल्याची माहिती कमलेशने दिली. पोलिसांनी विहिरीजवळील मोबाइल जप्त केला.



Source link

Advertisement