अहमदनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
नागालॅंडमध्ये आम्ही भाजपला पाठिंबा दिला नाही, तेथे देशविघातक कृती टाळण्यासाठी तेथील CM प्रयत्नशील आहेत, ऐक्याच्या दृष्टीने आम्ही त्यांच्यासोबत गेलो असून सर्वच पक्षांची ही भूमिका आहे असे युतीबाबत मत व्यक्त करून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कांद्याच्या पडत्या दरावरुन शरद पवारांनी आज केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले.
नागांचे काही प्रश्न आहेत
शरद पवार म्हणाले, आम्ही राष्ट्रवादी काॅंग्रेसने नागालॅंडला आज त्या ठिकाणी कुठलाच पक्ष बाहेर राहीला नाही. नागांचे काही इश्यू आहेत. एक काळ असा होता की, नागालॅंडमधील नागा संघटना देशविघातक कृती करीत होती. या सर्वांना एकत्र आणाव्या आणि अशा कृती टाळाव्यात यासाठी तेथील मुख्यमंत्री प्रयत्न करीत आहेत. ते मुख्यमंत्री भाजपचे नाहीत. त्यांनी सर्वांशी संपर्क केल्यानंतर आमच्या पक्षाचे सात लोक जे आहेत त्यांनी हे सांगितले की, आम्ही भाजपसोबत जाणार नाही. मात्र, ऐक्याच्या दृष्टीने काही पाऊले मुख्यमंत्र्यांनी जर टाकले असेल तर त्याला आम्ही नकारात्मक घेणार नाही.
कांद्याचा मुद्दा उपस्थित करणार
शरद पवार म्हणाले यांनी कांद्याचे दर कोसळण्याला केंद्र सरकारच्या योजना जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच कांद्याला योग्य भाव मिळायला हवा, असे म्हणत हा मुद्दा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उपस्थित करणार असल्याचेही ते म्हणाले.
केंद्राने कांद्याची निर्यात सुरू करावी
शरद पवार म्हणाले, कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आता कांद्याकडे बघायला तयार नाहीत. आज एक एकर कांद्याच्या बियाण्याला 10 हजार, लागवडीला 15 हजार खुरपणीला 8 हजार, खते आणि औषधांना प्रत्येकी 12 हजार, कांदा काढणीला 14 हजार, मशागत असा हा सर्व खर्च बघितला, तर 70 हजारांपेक्षा जास्त खर्च शेतकऱ्याला येतो. म्हणजे शेतकऱ्याला प्रतिकिलोमागे 8 ते 10 रुपये खर्च येतो. अशावेळी त्यांना बाजारात 3 ते 4 रुपये प्रती किलोने भाव मिळत असेल तर शेतकऱ्यांना काय आत्महत्या करायची का?
पवारांनी सांगितला कांद्यावरचा किस्सा
शरद पवार म्हणाले, मी कृषीमंत्री असताना एकदा कांद्याचे भाव वाढले म्हणत भाजपचे खासदार कांद्याच्या माळा घेऊन सभागृहात आले होते. सभापतींनी मला विचारले की, भाजपच्या खासदारांनी कांद्याचे भाव कमी करण्यासंदर्भात मागणी केली आहे. यावर तुम्ही मार्ग काढयला हवा. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, मी याबाबत काहीही मार्ग काढणार नाही. कांदा हे जिरायत शेतकऱ्याचे पीक आहे. त्यातून त्याला दोन पैसे मिळतात. त्यांना दोन पैसे मिळाले, तर लगेच कांद्याच्या माळा घालून निषेध करण्याचे काम सुरू आहे. त्याला माझा पाठिंबा नाही. तुम्ही माझा निषेध करा किंवा माझ्या विरोधात घोषणा द्या. कांद्याची किंमत कमी होईल, असा एकही निर्णय मी घेणार नाही. हेच माझे धोरण आहे, असे ते म्हणाले. देशात आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला जात विचारली गेली नाही. जर भराव्या लागणाऱ्या फार्मवर जर जात विचारली असेल तर ते योग्य नाही.