नाशिक7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेले धान्य वितरण कार्यालय नाशिकरोड भागात स्थलांतर करण्यात आले आहे. यामुळे शहरातील जुने नाशिकसह पंचवटी,गंगापुर रोड,सिडको, सातपुर भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. आता हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार फरांदेच्या प्रयत्नांना यश
याभागातील नागरिकांना रेशन कार्डशी संबंधित कामे घेऊन नागरिकांना थेट नाशिकरोड गाठावे लागत आहे. यामुळे नाशिकरोड येथील धान्य वितरण कार्यालय पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्याची मागणी नागरिकांसह आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून केली करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत धान्य व पुरवठा विभागाच्या कार्यालय ज्याठिकाणी स्थलांतर होणार आहे त्याची पाहणी आमदार देवयानी फरांदेसह जिल्हाधिकारी गंगाधरन डी, निवासी जिल्हाधिकारी, भागवत डोईफोडे जिल्हा पुरवठा अधिकारी अरविन्द नरसिहकर, धन्य पुरवठा अधिकारी पवार, तहसीलदार अनिल दोंदे यांच्याकडून करुन कार्यालय स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला.
धान्य वितरण विभागाचे कार्यालय पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच होते. त्यामुळे रेशनकार्ड व त्याच्याशी संबंधित कामे येथेच होते. परंतु २०१४ मध्ये हे कार्यालय नाशिकरोड येथे विभागीय महसूल कार्यालयाजवळ स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागापासून तब्बल आठ ते दहा किलोमीटरवर हे कार्यालय स्थलांतरीत झाल्याने शहरात राहणारे गोरगरीब नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. रेशन कार्डशी संबंधित कामे घेऊन नागरिकांना थेट नाशिकरोड गाठावे लागत आहे.
शहरातील जुने नाशिकसह पंचवटी,गंगापुर रोड,सिडको, सातपुर भागातील नागरिकांना रेशनकार्डमधील साधा नाव टाकायचा असेल किंवा आधार अपडेट करायेचा असेल तर त्यांना नाशिकरोड भागात जावूनच करावे लागत आहे.रेशनकार्ड संदर्भातील काम झोपडपट्टी भागातील नागरिकांनाच जास्त पडत असल्याने त्यांना स्वतंत्र रिक्षा करत कार्यालयात जावे लागत आहे.यामुळे वेळ, पैसा आणि श्रमाचाही अपव्यय होत असून हे कार्यालय पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयातच स्थलांतरीत करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.