नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणूक: मतदारांनी जांभळया रंगाचाच स्केच पेन वापरावा, निवडणूक विभागाचे आवाहन


नागपूरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

येत्या 30 जानेवारीला विधान परिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत असून मतदारांनी मतदान कसे करावे, याबाबतची मतदानाची पध्दती कशी असावी, याबाबत निवडणूक विभागाने मार्गदर्शन केले असून मतदारांनी जांभळया रंगाचाच स्केच पेन वापरण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

मतपत्रिकेबरोबर हे स्केच पेन तुम्हाला देण्यात येईल. अन्य कोणतेही पेन, मतपत्रिकेवर तुमचे नाव लिहू नका किंवा अन्य शब्द पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा अन्य कोणतेही लेखनाचे साधन मतदानासाठी वापरु नका कारण त्यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल.

उमेदवाराच्या नावासमोर लिहा

Advertisement

उमेदवाराच्या नावाच्या स्तंभासमोर पसंतीक्रम म्हणून असलेल्या स्तंभामध्ये तुम्ही प्रथम पसंतीचा उमेदवार म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर 1 असा आकडा लिहून मतदान करा. हा 1 हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर द्या. एकापेक्षा अधिक उमेदवारांची निवड करावयाची असली तरीदेखील 1 हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहा.

पसंतीक्रमानुसार लिहा

Advertisement

निवडणूक द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता जेवढे उमेदवार निवडणूक लढवत असतील तेवढे पसंतीक्रम तुम्हाला देता येतील उदाहरणार्थ, पाच उमेदवार निवडणुकीत उभे असतील आणि त्यापैकी एक उमेदवार निवडून द्यायचा असेल तरीही तुम्हाला तुमच्या निवडीच्या पसंतीक्रमाने उमेदवारांच्या नावासमोर 1 ते 5 असे आकडे घालता येतील.

उर्वरीत उमेदवारांबाबतचा तुमचा पुढील पसंतीक्रम, अशा उमेदवारांच्या नावासमोर असलेल्या “पसंतीक्रम” दर्शवायच्या स्तंभामध्ये तुमच्या पसंतीक्रमानुसार 2,3,4 इत्यादी आकडे घालून दर्शवा. कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर फक्त एकच आकडा तुम्ही घातलेला आहे याची खात्री करून घ्या.

Advertisement

भारतीय भाषेमध्ये चिन्हांकित करा

आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला नाही याची देखील खात्री करून घ्या. हा पसंतीक्रम फक्त 1, 2, 3 इत्यादी आकड्यांमध्येच दर्शवा. एक, दोन, तीन इत्यादी शब्दांमध्ये दर्शवू नका. हे आकडे भारतीय अंकाच्या 1, 2, 3 इत्यादीसारख्या आंतरराष्ट्रीय रुपात किंवा I, II, III इत्यादींसारख्या रोमन रुपात किंवा देवनागरी रुपात किंवा संविधानाच्या अनुसूची आठमधील मान्यता दिलेल्या कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रुपामध्ये चिन्हांकित करता येतील.

Advertisement

आकड्यांमध्येच दर्शवा

मतपत्रिकेवर तुमचे नाव लिहू नका किंवा अन्य शब्द लिहू नका किंवा तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे लिहू नका. तसेच, तुमच्या अंगठ्याचा ठसा देखील उमटवू नका. यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल. तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी तुमच्या निवडीच्या उमेदवाराच्या नावासमोर v/ किंवा x अशी खुण करणे पुरेसे होणार नाही. अशा मतपत्रिका बाद करण्यात येतील. यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे तुमचा पसंतीक्रम फक्त 1, 2, 3 इत्यादी आकड्यांमध्येच दर्शवा.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement