नागपूर विभागात 66 हजारपैकी 42 हजार 108 कर्मचारी संपावर: मेडिकल, मेयो, सुपरच्या शस्त्रक्रिया रखडल्या, रुग्णांचा जीव टांगणीला


नागपूर8 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सुमारे १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्त्यार उपसले आहे. नागपूर विभागातील महसूलसह इतर सर्व ६६ हजार ३९ कर्मचारी असून त्यापैकी ४२ हजार १०८ कर्मचारी संपावर गेल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली. परिणामी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. तर नागपुरातील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यासह इतर कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे रूग्णसेवा विस्कळीत झाली. परिणामी येथील नियोजित बहुतांश शस्त्रक्रिया स्थगित केल्या गेल्या. तर आता केवळ अत्यावश्यक शास्त्रक्रियाच होत आहे. येथे गंभीर वगळून इतर रुग्णांना दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा रुग्णांचा आरोप आहे.

Advertisement

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयांतील परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसह वर्ग तीन व चारच्याही सगळ्याच कर्मचाऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. रुग्णालय प्रशासनाकडून मात्र रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतल्याचा दावा होत आहे. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी, सर्व बाह्यरुग्णसेवा विभाग, आकस्मिक विभाग, प्रयोगशाळा सुरू असल्याचा दावा केला.

दरम्यान मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयांतील दोन हजारावर परिचारिका, तंत्रज्ञ स्वच्छता कर्मचारीही मोठ्या संख्येने संपात सहभागी असल्याचा संघटनांचा दावा आहे. तर रुग्णांसाठी प्रशासनाने परिचारिका महाविद्यालयांतील विद्यार्थी, निवासी व आंतरवासिता डॉक्टरांसह इतरही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध वाॅर्डामध्ये सेवा लावल्या आहे.

Advertisement

मेयो, मेडिकलमधील ९० टक्के तृतीय, चतुर्थ कर्मचारी व परिचारिका संपावर असल्याने रूग्णसेवा कोलमोडली. फार्मासिस्ट संपावर असल्याने इंजेक्श्न देण्यापासून औषधे देण्यापर्यत हाल होते. निवासी डाॅक्टरांनी रक्त तपासणी केली. मात्र २० ते ३० टक्के होऊ शकली. मेयो, मेडीकलसह डागा शासकीय स्री रूग्णालय, प्रादेशिक मनोरूग्णालय, कामगार विमा रूग्णालयातील कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने रूग्णांची हेळसांड झाली.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement