नागपुरात ऑटोतून महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक: 100 सीसीटीव्ही फुटेज तपासून लावला शोध

नागपुरात ऑटोतून महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक: 100 सीसीटीव्ही फुटेज तपासून लावला शोध


नागपूर14 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

ऑटाेतून महिलांचे दागीने चोरणाऱ्या एका महिलेला हुडकेश्वर पोलिसांनी शिताफीने अटक केली. यासाठी छत्रपती चाैक ते मानेवाडा चौका दरम्यानचे 100 सीसीटीव्ही फुटेज तपासून या महिला चोरटीचा शोध पोलिसांनी लावला. या महिले जवळून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार यातील फिर्यादी उर्मिला अशोक भुजबळे (वय 49) या वर्धेच्या रहिवासी आहे. नागपूर येथे राहणारी त्यांची वहिनी वनीता चरडे हिची सोन्याची पोत व पाच ग्रॉमची अंगठी देण्यासाठी भुजबळे नागपुरल्या आल्या व कोराडी येथे राहणारे स्वप्नील मांगे यांच्या घरी थांबल्या. दुसऱ्या दिवशी उर्मिला भुजबळे या त्यांच्या मुलीसह मेट्रोने छत्रपती चौकात आल्या व तेथून म्हाळगी नगरला जाण्यासाठी ऑटो केला. त्याचवेळी त्यांच्या शेजारी अंदाजे 40 ते 45 वर्षाची एक महिला येऊन बसली.

उर्मिला भुजबळे यांनी पर्समध्ये वहिनीचे दागीने ठेवले होते. आॅटोतील महिलेजवळ एक काळ्या रंगाची बॅग होती. महिला मानेवाडा चौक येथे उतरली. नंतर म्हाळगी नगर चौक जवळ आल्याने उर्मिला भुजबळे यांनी पैसे काढण्यासाठी पर्स पाहली असता पर्स उघडी दिसली. आतमध्ये ठेवलेली सोन्याची पोत व अंगठी दिसून आली नाही. आजूबाजूला शोध घेतला असता मिळून न आल्यामुळे हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

Advertisement

पोलीस ठाणे हुडकेश्वर येथील तपास पथकातील अधिकारी व अमंलदारांनी महिला आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसर पिंजून काढला. शहरात रस्त्यांवर लागलेले तसेच लोकांच्या घरी, दुकानात लावण्यात आलेले अंदाजे 100 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक करून व खबऱ्याने दिलेल्या माहिती वरून महिला सवीता शेन्डे (विवेकानंद नगर, कन्हान) हिला ताब्यात घेतले. महिला अमंलदाराने तिला विश्वासात घेऊन बारकाईने विचारपूस केली असता तिने ऑटोतून दागीने चोरल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरी केलेली सोन्याची पोत, एक सोन्याची अंगठी असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.



Source link

Advertisement