नांदेड – मुंबई – नांदेड अकोल्यावरून विशेष गाडी: हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे द्वी – साप्ताहिक ट्रेन


अकोला5 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेवून नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई -नांदेड मार्गे बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला या द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या 20 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे.

Advertisement

यानुसार गाडी क्रमांक 07426 नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ही विशेष गाडी नांदेड येथून 30 जानेवारी आणि 6, 13, 20 आणि 27 फेब्रुवारीला दर सोमवारी रात्री 21.15 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे मंगळवारी दुपारी 13.30 वाजता पोहोचेल.

तसेच गाडी क्रमांक 07427 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – नांदेड ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 31 जानेवारी आणि 7, 14,21 आणि 28 फेब्रुवारीला दर मंगळवारी दुपारी 16.40 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे बुधवारी सकाळी 9.30 वाजता पोहोचेल.

Advertisement

गाडी क्रमांक 07428 नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई विशेष गाडी नांदेड येथून 25 जानेवारी आणि 1, 8, 15 आणि 22 फेब्रुवारीला दर बुधवारी रात्री 21.15 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे गुरुवारी दुपारी 13.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07429 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई नांदेड विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 26 जानेवारी आणि 2, 9, 16 आणि 23 फेब्रुवारीला दर गुरुवारी दुपारी 16.55 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे शुक्रवारी सकाळी 9 वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांत वातानुकुलीत डब्बे तसेच स्लीपर क्लासचे डब्बे असतील.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement