नांदेडच्या 13 वर्षीय लक्ष्मीला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर: स्वतःचा जीव धोक्यात घालून वीज तारेला चिटकलेल्या लहान भावाला वाचवलेनांदेड20 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

वीज तारेला चिटकलेल्या आपल्या लहान भावाला वाचवरणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातल्या थडी सावळी येथील 13 वर्षांच्या लक्ष्मी येडलेवार या विद्यार्थिनीला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

Advertisement

पुरस्कार मिळाल्याचा लक्ष्मीने आनंद व्यक्त केला. तिला आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना भेटायचे आहे. पुढे खूप शिकून डॉक्टर किंवा कलेक्टर व्ह्यायची तिची इच्छा आहे. येत्या 26 जानेवारी रोजी दिल्लीत या पुरस्काराने लक्ष्मीचा गौरव केला जाणार आहे.

गावाला झाला आनंद

Advertisement

भारत सरकारकडून शूरवीर बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा तो मान महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या अवघ्या 13 वर्षांच्या लक्ष्मीला मिळाला आहे. याबद्दल तिच्या थडी सावळी गावाचा आनंदही गगनात मावत नाही आहे. लक्ष्मीने विद्युत तारेला चिकटलेल्या आपल्या लहान भावाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. तिच्या या शौर्याचे आता राष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे.

आदित्य चिटकला…

Advertisement

लक्ष्मी येडलेवार हिचे आई – वडील दोघेही शेतमजूर आहेत. घटनेच्या दिवशी 21 सप्टेंबर 2021 रोजी लक्ष्मीचे आई – वडील कामाला गेले होते.दुपारी लक्ष्मी घरात अभ्यास करत बसली होती. तिचा 4 वर्षांचा भाऊ आदित्य घरा मागून येत होता, पण बाजूच्या पत्राच्या घरात वीज प्रवाह उतरला. पत्र्यावर एक लोखंडी तार बांधली होती. त्या तारेला आदित्यचा हात लागून तो चिटकला होता.

लक्ष्मी पडली बेशुद्ध

Advertisement

विजेच्या धक्क्याने आदित्य ओरडल्याने लक्ष्मी बाहेर आली. तारेला चिटकलेला भाऊ पाहून तिने क्षणाचा विचार न करता त्याच्या दिशेने धावली. भावाचा शर्ट पकडून तिने भावाला बाजूला काढले, पण ती तारेला चिटकली आणि बेशुद्ध पडली. गावकऱ्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. दोघांचे प्राण वाचले.

धाडसाची घेतली दखल

Advertisement

लक्ष्मीच्या या धाडसाची दखल घेत भारत सरकारने तिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार मिळाल्याचा लक्ष्मीला आनंद आहे. आता तिला राष्ट्रपती आणि पंतप्रधानाना भेटायचे आहे. खूप शिकून डॉक्टर किंवा कलेक्टर व्ह्यायची तिची इच्छा आहे.

अनपेक्षितरित्या पुरस्कार

Advertisement

लक्ष्मीचे वडील आणि थडी सावळीच्या गावकऱ्यांना देखील वाटले तिला हा पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. मात्र, आता गावचे नाव देश पातळीवर झळकल्याने तिचे कुटुंब आणि गावकरी आनंदित आहेत. येत्या 26 जानेवारी रोजी दिल्लीत या पुरस्काराने लक्ष्मीचा गौरव केला जाणार आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement