नांदगाव पेठमध्ये कबड्डी सामने: 2 ते 4 डिसेंबरपर्यंत स्थानिक ग्रामपंचायतीच्या प्रांगणात रंगणार स्पर्धा


अमरावती3 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

संत काशिनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त 2 ते 4 डिसेंबर दरम्यान स्थानिक ग्रामपंचायतीच्या प्रांगणात राज्यस्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्तरंग क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने हे आयोजन करण्यात येत असून राज्यातील नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

Advertisement

शुक्रवारी (दि. 2 डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री आ. प्रवीण पोटे यांची उपास्थिती असणार आहे. उद्घाटन म्हणून राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, तर विशेष उपस्थिती म्हणून विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितू ठाकूर, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव विवेक गुल्हाने, किशोर भुयार, पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. सुमित पवार, संजय कापडे, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश डफळे यांची उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव पेठ येथील सरपंच कविता डांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य भारती गेडाम, नितीन हटवार, प्रा. मोरेश्वर इंगळे उपस्थित राहतील. या कबड्डी स्पर्धेला राज्यातील नामवंत संघ उपस्थित राहणार असून प्रथम विजेत्या संघा रोख पारितोषिक व संत काशिनाथ बाबा चषक दिला जाणार आहे, तर द्वितीय व तृतिय विजेत्या संघाला रोख स्वरुपात बक्षिस देण्यात येईल.

Advertisement

या प्रसंगी ज्येष्ठ कबड्डीपटूंचा सत्कार, गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सप्तरंग क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. 4 डिसेंबर रोजी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडणार असून कबड्डीप्रेमींनी या सामान्यांचा लाभ घेण्याचे आवाहन सप्तरंग क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement