साताराएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणारे आणि मंत्रिपद उपभोगणारे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी युती सरकारचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. सत्तेची भांग पिल्यानंतर अंगात आल्याप्रमाणे माणूस डुलायला, नाचायला लागतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टोलबाजी केली आहे.
रयत क्रांती संघटनेमाध्यमातून सदाभाऊ खोत यांनी 22 मे पासून वारी शेतकऱ्यांची हे आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी कराड ते सातारा अशी पदयात्रा काढली. या आंदोलनाच्या सांगता कार्यक्रमात खोतांनी आपल्या शैलीत मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सडकून टीका केली.
का झाले आक्रमक?
ऊस भावासाठी महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू करा, उसाला चार हजार रुपये भाव द्यावा, दोन कारखान्यांमधील 25 किलोमीटरचे हवाई अंतर कमी करावे, तुकडे बंदी कायदा रद्दा करावा, या मागण्यांसाठी सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांतीच्या माध्यमातून आंदोलन केले. या मागण्या पूर्ण नाही केल्यास शेकडो वाहने घेऊन मुंबईला धडकू, असा इशाराही दिला. मात्र, या आंदोलनाला शंभूराज देसाईंनी महत्त्व दिले नाही. त्यामुळे सदाभाऊ खोत आक्रमक झालेत.
भाग्यवान माणूस कोण?
सदाभाऊ खोत म्हणाले, साताऱ्याचा पालकमंत्री असणारा तो भाग्यवान माणूस कोण, हेच माहिती नाही. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर मोर्चा निघाला. मात्र, पालकमंत्र्यांनी एक फोनही केला नाही. आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर, रुग्णवाहिकाही दिली नाही. याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे यावेळी सहकार मंत्री अतुल सावे उपस्थित होते.
खोतांचे नशेत वक्तव्य
सदाभाऊ खोत म्हणाले की, सत्तेची भांग पिल्यानंतर अंगात आल्याप्रमाणे माणूस डुलायला, नाचायला लागतो. मात्र, ही नशा उतरली की हे सगळे गेलेले असेल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. या टीकेला शंभूराज देसाई यांनी दोनच वाक्यात उत्तर दिले. सदाभाऊ खोतच भांग पित असतील. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य नशेत केले असेल, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
इतर बातम्याः
गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल होणार:सातारा न्यायालयाने दिला आदेश; नृत्यात अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, स्टेजवर येताच पब्लिक झाली बेफाम; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज