नवी दिल्ली: रुग्णालयात अपडेट होणार हेल्थ रेकॉर्ड, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनचे (एनडीएचएच) नाव बदलणे शक्य


  • Marathi News
  • National
  • Hospital Health Records To Be Updated, National Digital Health Mission (NDHH) Renamed

Advertisement

नवी दिल्ली25 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनचे (एनडीएचएच) नाव बदलून आता प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ मिशन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. १४ क्रमांकाच्या युनिक हेल्थ आयडीसोबतच ई-मेलसारखा एक आयडीदेखील तयार करता येऊ शकेल. त्यावर आरोग्यासंबंधी सर्व माहिती साठवता येणार आहे.

Advertisement

त्यासाठी व्यक्तीच्या नावे ई-मेल आयडी तयार केला जाणार आहे. त्यास पीएचआर (पर्सनल हेल्थ रेकाॅर्ड) असेही संबोधले जाईल. त्याचा पासवर्ड तुम्ही ठरवू शकता. आयडी तयार केल्यानंतर १४ क्रमांकी आयडी लक्षात ठेवण्याची गरज नाही. ई-मेल अॅड्रेस व पासवर्डनेदेखील तुम्ही तुमच्या आरोग्याची संपूर्ण माहिती पाहू शकता. कोणताही व्यक्ती healthid.ndhm.gov.in वर जाऊन आपला पीएचआर आयडी तयार करू शकतो.

नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे एक अधिकारी म्हणाले, कार्ड तयार करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाच्या नोंदणी काउंटरवर डेटा एन्ट्री ऑपरेटर असेल. रुग्णालयाच्या इंटर्नल आयटी सिस्टिममध्ये एनडीएचएम इन्स्टॉल असेल. रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात जाताच त्याचे हेल्थ आयडी तयार होईल. त्यानंतर डॉक्टरकडे प्रत्येक वेळी गेल्यावर १४ अंकांचा क्रमांक सांगावा लागेल. मोबाइलवर आलेला आेटीपी सांगावा लागेल. त्यानंतर डॉक्टर रुग्णाची तपासणी करतील. रुग्णाची माहिती हेल्थ कार्डमध्ये अपलोड केली जाईल.

Advertisement

रुग्ण एनडीएचएमअंतर्गत नोंदणीकृत प्रयोगशाळेत तपासणी करत असल्यास त्यास आयडी क्रमांक व मोबाइलवर आलेला आेटीपी सांगावा लागेल. प्रयोगशाळेतील अहवालास हेल्थ रेकाॅर्डमध्ये अपलोड केले जाईल.

प्रायोगिक तत्त्वावर योजना यशस्वीपणे सुरू
प्रायोगिक तत्त्वावर ही योजना अंदमान-निकोबार, चंदीगड, दादरा-नगर हवेली, दमण-दीव, लडाख व लक्षद्वीपसारख्या केंद्रशासित प्रदेशात राबवण्यात आली. तेथे काही ठिकाणी डॉक्टरांची स्वत: तर काही ठिकाणी डेटा एन्ट्री ऑपरेटरची मदत घेण्यात आली. रुग्णसंख्या जास्त असलेल्या ठिकाणी डेटा एन्ट्री ऑपरेटर ठेवावा लागणार आहे. रुग्ण स्वत:देखील आपले हेल्थ रिपोर्ट अपलोड करू शकेल.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement