नवी दिल्ली: गुगलविरुद्ध भारतात चौकशीचे आदेश, गुगल कंपनीला एकाधिकाराचा दुरुपयोग करता येणार नाही : सीसीआय


  • Marathi News
  • National
  • Inquiry Order Against Google In India, Google Cannot Abuse Monopoly: CCI | Marathi News

Advertisement

नवी दिल्ली18 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सर्च इंजिन गुगल आपल्या क्षेत्रात एकाधिकारामुळे भारतातही अपलाभ घेत आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयाेगाने (सीसीआय) या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. डिजिटल न्यूज पब्लिशर्स असाेसिएशनच्या (डीएनपीए) तक्रारीनंतर सकृतदर्शनी प्रतिस्पर्धा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे सीसीआयने मान्य केले आहे. ऑनलाइन जाहिराती व अॅप डेव्हलपर्सकडून प्ले स्टोअरच्या नावाखाली मनमानी कमिशन उकळल्याप्रकरणी गुगलची आधीच भारतात चौकशी सुरू आहे.

Advertisement

आयाेगाने ताज्या आदेशात मान्य केले आहे की, गुगल एकाधिकाराचा दुरुपयाेग करून डिजिटल न्यूज पब्लिशर्सवर अयोग्य अटी लादत आहे. आयाेगाने गुगल व त्याची मूळ कंपनी अल्फाबेटविरुद्ध ६० दिवसांत तपास अहवाल मागवला आहे. डीएनपीएच्या तक्रारीनुसार, एखादी माहिती सर्च केल्यानंतर कोणती वेबसाइट आधी दिसेल हे गुगल अल्गोरिदमद्वारे ठरवते. भारतीय न्यूज प्रकाशक दर्जेदार मजकुरासाठी मोठी गंुतवणूक करतात. मात्र जाहिरातींच्या रकमेचा मोठा भाग गुगल ठेवून घेते. गुगल न्यूजसारख्या प्लॅटफॉर्मवरही ती पब्लिशर्सचाच कंटेंट दाखवून कमाई करतेय. आयोगाने म्हटले, लोकशाहीत न्यूज मीडियाची महत्त्वाची भूमिका आहे. बड्या टेक कंपन्यांना एकाधिकाराचा दुरुपयोग करता येऊ नये. जाहिरात महसुलाचे सर्वांमध्ये योग्य वाटप झाले पाहिजे.

फ्रान्स, आॅस्ट्रेलियात करावे लागले होते पेमेंट
सीसीआयने आदेशात फ्रान्स व ऑस्ट्रेलियाच्या नव्या नियमांचाही उल्लेख केला. त्यात गुगलला स्थानिक वृत्त प्रकाशकांना योग्य मानधन देण्यास राजी व्हावे लागले. युराेपियन युनियनही टेक कंपन्यांकडून प्रकाशकांना पेमेंट करण्याचा कायदा करत आहे. मात्र त्याला गुगल विराेध करत आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement