नवीन कायद्याने सहकारी संस्था नियंत्रणात येतील: संगमनेर येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन

नवीन कायद्याने सहकारी संस्था नियंत्रणात येतील: संगमनेर येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन


अहमदनगर38 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार नवीन सहकार कायदा अस्तित्वात आणत आहे. तो लागू होताच सर्व व्यवहार संगणकीय होणार असल्याने सहकारी संस्था नियंत्रणात येतील. या सर्व प्रक्रियेवर केंद्र सरकारचे नियंत्रण असणार आहे. या कायद्यातून सक्षम अर्थव्यवस्था तयार करण्याचे काम होणार असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Advertisement

संगमनेर शहरातील सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन नगर रोड येथील नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री वळसे बोलत होते. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, भाजपचे श्याम जाजू, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, मर्चंट बँकेचे संचालक राजेश मालपाणी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, सर्वोदय पतसंस्थेचे अध्यक्ष कल्पेश मेहता, उपाध्यक्ष सतीश शाह, व्यवस्थापक मधुकर वनम यावेळी उपस्थित होते.

सहकार चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न

Advertisement

मंत्री वळसे म्हणाले, सहकार विभाग कृषी विभागाला जोडलेला होता. त्यातून सहकार विभाग स्वतंत्र केला आहे. सहकार कायद्यात अनेक त्रुटी आहेत. सहकार पुढे न्यायचा असेल तर नवीन कायद्यात सोसायट्यांमध्ये आधीच्या प्रक्रिया चालणार नाही. गाव पातळीवर उत्पादनाचे साधन म्हणून सोसायट्यांच्या उपयोग होणार असल्याने अर्थव्यवस्था भक्कम उभी राहील. देशात परकीय कंपन्या गुंतवणूक करत आहे, त्यांना पोषक वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सहकार राज्याचे बलस्थान आहे. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था उभी आहे. अनेक नेत्यांचे यात योगदान आहे. सहकार क्षेत्रात अडचणी वाढत आहे. सहकार चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला पायबंध घालून सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मंत्री वळसे यांनी सांगितले.

पतसंस्थामध्ये गोरगरीबांच्या ठेवी गुंतल्या

Advertisement

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून बँका, पतसंस्था, कारखाने, सोसायट्या स्थापन झाल्या. विकासाला ताकद व गती देण्याचे काम सहकारातून झाले. स्वर्गीय नवीनभाई शहा यांनी सर्वोदय पतसंस्थेची स्थापना केली. त्यांच्या कडवट शिस्तीतुन संस्था प्रगतीपथावर आहे. संस्थेच्या 200 कोटीच्या ठेवी आहेत. सहकारातील नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे तालुक्यात सहकाराच जाळ विणल गेल. येथील अनेक पतसंस्थांमध्ये गोरगरिबांच्या ठेवी गुंतल्या आहेत. त्या मिळण्यात अडचणी येत आहे. त्या मिळण्यासाठी सर्वोदय पतसंस्था व संगमनेर तालुका पतसंस्था फेडरेशनने मार्गदर्शन करावे, असे आवाहन आमदार थोरात यांनी केले. प्रस्ताविक उपाध्यक्ष सचिन शहा यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता गुन्हे यांनी तर आभार गौरी शहा यांनी मानले



Source link

Advertisement