नवा विक्रम: 500+ धावा करणारा 13 वर्षांचा यश जगात दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज


नागपूर40 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

वयाच्या १३ व्या वर्षी नागपूरचा फलंदाज यश चावडेने आंतरशालेय स्पर्धेत नाबाद ५०८ धावा करून इतिहास रचला. ४० षटकांच्या सामन्यात १७८ चेंडूत ८१ चौकार आणि १८ षटकारांच्या या खेळीमुळे यश मर्यादित षटकांमध्ये ५००+ धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज बनला. यापूर्वी, श्रीलंकेच्या चिरथ सेलेपेरुमाने २०२२ मध्ये श्रीलंकेत १५ वर्षांखालील सामन्यात ५५३ धावांची खेळी केली होती.

Advertisement

{मनोरंजक… एकही विकेट न गमावता ७१५ धावांचे लक्ष्य देऊन, विरोधी संघ ५ षटकांत ९ धावांत गुंडाळला : मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय स्पर्धेत सरस्वती विद्यालयाने चावडेच्या ५०८ धावांच्या जोरावर ७१४ धावा केल्या. प्रत्युत्तरात सिद्धेश्वर विद्यालयाचा संघ ९ धावांत सर्वबाद झाला.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement