नवाब मलिक Vs समीर वानखेडे: अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? नवाब मलिकांचा वानखेडेंवर पुन्हा हल्लाबोल


Advertisement

मुंबईएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरील हल्लाबोल सुरुच आहे. नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडेंची आई जाहिदा यांचे मृत्यू प्रमाणपत्र शेअर केले आहे. या प्रमाणपत्राद्वारे नवाब मलिक दावा करत आहे की, जाहिदा यांना ओशिवराच्या कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले होते. जाहिदा यांच्या मृत्यूनंतर वानखेडे कुटुंबीयांनी दोन मृत्यू प्रमाणपत्रे बनवले.

Advertisement

पहिल्या प्रमाणपत्रात जाहिदा यांचा धर्म हिंदू असे लिहिले आहे. दुसऱ्यामध्ये जाहिदाचा धर्म मुस्लिम असे लिहिले आहे. -16/4/2015 रोजी जाहिदा यांचे निधन झाले. 16/4/2015 रोजी पहिले प्रमाणपत्र तयार करण्यात आले ज्यामध्ये जाहिदाचा धर्म मुस्लिम असे लिहिले आहे. दुसरे प्रमाणपत्र 17/4/2015 रोजी तयार करण्यात आले, ज्यामध्ये जाहिदाचा धर्म हिंदू असे लिहिले होते.

Advertisement

या प्रमाणपत्रांद्वारे नवाब मलिक यांनी दावा केला आहे की, जाहिदा यांच्या मृत्यूनंतर वानखेडे कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रे तयार केले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here