Sign in Join
  • Home
  • News
  • Stories
  • Videos
  • Contact Us
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Create an account
Privacy Policy
Sign up
Welcome!Register for an account
A password will be e-mailed to you.
Privacy Policy
Password recovery
Recover your password
Search
Friday, March 24, 2023
  • Sign in / Join
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and conditions
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Create an account
Privacy Policy
Create an account
Welcome! Register for an account
A password will be e-mailed to you.
Privacy Policy
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
MAHARASHTRA MANORANJAN KENDRA Maharashtra Manoranjan Kendra
MAHARASHTRA MANORANJAN KENDRA MAHARASHTRA MANORANJAN KENDRA
  • Home
  • News
  • Stories
  • Videos
  • Contact Us
Home News ‘नगरविकास’चे मनपाला आदेश: क्राॅकीटीकरणाचा हट्ट साेडा, 3 महिन्यात पेठराेडचे डांबरीकरण करा, आमदार...
  • News

‘नगरविकास’चे मनपाला आदेश: क्राॅकीटीकरणाचा हट्ट साेडा, 3 महिन्यात पेठराेडचे डांबरीकरण करा, आमदार ढिकलेंनी मांडला होता तारांकित प्रश्न

By
MMK Media Team
-
10 March 2023
Pinterest
WhatsApp
Email
    26
    SHARES
    1.1k
    VIEWS
    Share on FacebookShare on Twitter


    नाशिक2 तासांपूर्वी

    Advertisement
    • कॉपी लिंक

    एक ते दिड फूट खड्ड्यांनी वेढलेल्या पेठराेड दुरुस्तीसाठी एकीकडे निधी नाही म्हणून रडायचे व दुसरीकडे ७१ काेटीचे क्राॅकीटीकरणच करायचे असा हट्ट धरून संपुर्ण नाशिकला वेठीस धरणाऱ्या महापालिका प्रशासनाचे राज्याच्या नगरविकास खात्यानेच कान टाेचले. पावसाळापुर्वी तीन महिन्यात डांबरीकरण करण्याचे आदेशच नगरविकास खात्याचे, अवर सचिव शंकर जाधव यांनी काढले आहे.

    Advertisement

    वारंवार पाठपुरावा करूनही पालिका आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून सकारात्मक भुमिका घेतली जात नसल्याचे बघून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अ‌ॅड. राहुल ढिकले यांनी थेट विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याच्या नगरविकास खात्याने महापालिकेच्या काेर्टात चेंडू टाकला आहे.

    राहु हाॅटेलपासून तर पुढे दिंडाेरीची हद्द सुरू हाेईपर्यंतचा जवळपास साडे सहा किमीचा पेठराेड मागील पावसाळ्यात पुर्णत: उखडला आहे. जवळपास साडे सहा किमीचा रस्ता खचला असून या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

    Advertisement

    गुजरातकडून येणारे पर्यटक, स्थानिक रहीवासी तसेच दिंडाेरी, पेठकडून येणाऱ्या भाजीपाला व अन्य अवजड वाहनांचीही दयनीय अवस्था हाेत असून गत सप्टेंबर महिन्यापासून तर आतापर्यंत किमान शंभरहून अधिक आंदाेलनेही पेठराेड दुरूस्तीसाठी झाली नाही. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अ‌ॅड. राहुल ढिकले यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर पालिकेने अर्थिक परिस्थीती नाजुक असल्याचे सांगत ७१ काेटीची मागणी जिल्हा नियाेजन समितीकडे पाठवली मात्र नियाेजन समितीकडूनही हिरवा कंदील मिळालेला नाही.

    त्यानंतर राज्याच्या बांधकाम विभागाकडे रस्ता हस्तांतरीत करून तिकडून निधी मिळताे का याची चाचपणी करून बघितले मात्र, त्यात यश आले नाही. त्यानंतर स्मार्टसिटीत वादग्रस्त ठरलेल्या ठेकेदाराकडे हे काम २०१८ मधील जुने दर आकारून करण्याचे प्रयत्न झाले मात्र या ठेकेदाराने गावठाणात केलेल्या रस्त्यांची ‘किर्ती’ लक्षात घेत संबधिताला काम दिल्यास जन आंदाेलन हाेण्याची भिती निर्माण झाली.

    Advertisement

    दरम्यान, ढिकले यांनी सर्वच यंत्रणांकडून हाेत असलेली टाेलवाटाेलवी बघून विधीमंडळाने दिलेल्या अधिकारांचे अस्त्र उपसले व थेट तारांकीत प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधल्यानंतर आता तीन महिन्यात अर्थातच पावसाळ्यापुर्वी डांबरीकरणाचे काम पुर्ण करण्याचे आदेश महापालिकेला राज्याच्या नगरविकास खात्याने दिले आहेत. त्यामुळे नगरविकास खात्याच्या आदेशाचे पालन करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

    डांबरीकरण न केल्यास लक्षवेधी मांडणार

    Advertisement

    हाॅटेल राहूू ते नाशिकची हद्दीपर्यंतचा पेठराेड दुरूस्त हाेणे गरजेचे आहे. वारंवार मागणी करून गत आठ महिन्यात पालिकेने टाेलवाटाेलवी केली आहे. आता राज्य शासनानेच आदेश दिल्यामुळे तीन महिन्यात डांबरीकरणाचे काम हाेणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार. – अ‌ॅड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पुर्व

    Advertisement
    बातम्या आणखी आहेत…



    Source link

    Advertisement
    • TAGS
    • Cricketization
    • Dindori
    • Divya Marathi News MLA Rahul Dhikle
    • Government of Maharashtra
    • maharashtra assembly
    • Nashik CT News
    • nashik latest news
    • Nashik Municipality
    • Nashik news
    • Pethraed Nashik
    • Starred Questions
    • Urban Development Account
    Pinterest
    WhatsApp
    Email
      Previous articleबीसीसीआयच्या शिबीरासाठी प्रतीक तिवारीची निवड: नाशिकच्या डावखुऱ्या फिरकीपटूची राष्ट्रीय शिबीरासाठी वर्णी
      Next articleमहाराष्ट्र साहित्य परिषदेची दिवाळी अंक स्पर्धा: निकाल जाहीर; शब्दमल्हार, नवल, उद्याचा मराठवाडा, पुणे पोस्ट हे मानकरी
      MMK Media Team
      Maharashtra Manoranjan Kendra is an Online Platform that creates a variety of entertainment content. Get the Latest News on Entertainment, Sports, Lifestyle, Travel, Humour & Opinions from leading columnists on Maharashtra Manoranjan Kendra.

      RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

      लाचामृत: बाप-लेकीचा फडणवीसांना अडकवण्याचा होता डाव, सर्वकाही प्लॅनिंगनुसार सुरू होते; पोलिस तपासात नवा खुलासा

      महिला महाराष्ट्र केसरी: सांगलीत क्रीडा संकुल अंधारात, महिला स्पर्धकांना ढिसाळ नियोजनाचा फटका, वीज बिल थकल्याने पुरवठा खंडीत

      आरोप: भाजपचा राज्यात दंगली घडवण्याचा डाव, संजय राऊतांचा मोठा आरोप; म्हणाले -पडद्यामागे पटकथा लिहिणे सुरू

      STAY UPDATED

      Subscribe to our newsletter and receive our latest articles and stories straight into your inbox. Stay updated with Maharashtra Manoranjan Kendra!
      - Advertisement -

      STAY CONNECTED

      9,963FansLike
      164FollowersFollow
      135SubscribersSubscribe

      STORIES

      अंतर्नाद : श्रीगणेश, कलासंगीत आणि धर्मसंगीत

      MMK Media Team - 12 September 2021 0
      डॉ. चैतन्य कुंटे ‘पयलं नमन करुनी वंदन’ हे नमन असो की ‘या नाचत रंगणी गणोबा’ हा गण असो, ‘प्रथम सुमर श्रीगणेश’ हे ध्रुपद किंवा...

      संशोधिका : देशसेवेसाठी विज्ञान | Sanshodhika author ruchira sawant science Basic research ysh 95

      MMK Media Team - 18 June 2022 0
      रुचिरा सावंत‘भाभा अ‍ॅटॉमिक रीसर्च सेंटर’ येथून सुरुवात करून देशातल्या संशोधन कार्याचा पाया रचणारं मूलभूत संशोधन करणाऱ्यांपैकी एक म्हणजे डॉ. देवकी रामनाथन. धातूंच्या पृष्ठभागावरील...

      नात्यांचा बहर!

      MMK Media Team - 12 November 2022 0
      अनुश्री कुबडेया वर्षी आमच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली. माझी आणि शैलेशची पहिली भेट अजूनही मला तशीच्या तशीच आठवते. आईच्या घरी ‘टिपिकल कांदेपोहे’चा...

      review of asvsth divsanchi sugi book by aurhor kavita mhetre zws 70

      MMK Media Team - 14 August 2022 0
      सुनंदा भोसेकरआधुनिक मराठी कवितेमध्ये स्त्रियांच्या कवितेची आणि स्त्रीकेंद्री कवितेची सशक्त परंपरा आहे. स्त्रीकेंद्री जाणिवा व्यक्त करणारा कविता म्हेत्रेंचा नवा कवितासंग्रह नुकताच आला आहे.....

      राशिभविष्य : दि. ७ ते १३ जानेवारी २०२२

      MMK Media Team - 7 January 2022 0
      सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.comमेष रवी-चंद्राचा लाभयोग कामाचा उरक वाढेल. समजूतदारपणा दाखवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे ठोकताळे खरे ठरतील. सद्य परिस्थितीशी शांत डोक्याने सामना कराल. सहकारी...
      MAHARASHTRA MANORANJAN KENDRA
      ABOUT US
      LATEST NEWS | ENTERTAINMENT | STORIES | VIDEOS | HUMOUR
      Contact us: info@mmkmedia.in
      FOLLOW US
      • Home
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms and conditions
      © Maharashtra Manoranjan Kendra 2020