धोनी पुन्हा चेन्नईचा कर्णधार होण्यामागचे कारण म्हणजे जडेजा अपयशी झाला का?, नेमके काय वाचा…

धोनी पुन्हा चेन्नईचा कर्णधार होण्यामागचे कारण म्हणजे जडेजा अपयशी झाला का?, नेमके काय वाचा...
धोनी पुन्हा चेन्नईचा कर्णधार होण्यामागचे कारण म्हणजे जडेजा अपयशी झाला का?, नेमके काय वाचा...

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रवींद्र जडेजाने शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वीच कर्णधारपद सोडलेला महेंद्रसिंग धोनी पुन्हा संघाची धुरा सांभाळणार आहे. जडेजाला कर्णधारपदाचे दडपण सांभाळता आले नाही. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवले. चेन्नई संघाने चालू हंगामात आतापर्यंत केवळ दोनच सामने जिंकले आहेत. आठ सामन्यांत सहा पराभवांसह संघ नवव्या स्थानावर आहे. त्याने आठ सामन्यांत सहा पराभव पत्करल्यानंतर पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी याची घोषणा केली. जडेजाला आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनी कर्णधार म्हणून खेळणार आहे. आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस आधी त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये चार वेळा विजेतेपद पटकावले. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने १२१ सामने जिंकले.

चेन्नई सुपर किंग्सच्या प्रेस रिलीझनुसार “रवींद्र जडेजाने आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि एमएस धोनीला चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. एमएस धोनीने चेन्नईच्या हितासाठी नेतृत्व करण्याचे स्विकार केले आहे आणि जडेजाला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी दिली आहे,” असे म्हटले आहे.

Advertisement

महेंद्रसिंग धोनीने आयपीएल १५ सुरू होण्याच्या काही दिवस आधी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला ही जबाबदारी देण्यात आली. जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला आठ पैकी सहा सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पहिला विजय मिळवला. तर दुसरा विजय मुंबई इंडियन्सविरुद्ध मिळवला होता. चेन्नई सुपर किंग्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे- जडेजाने खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने महेंद्रसिंग धोनीला पुन्हा कर्णधारपद स्वीकारण्याची विनंती केली आहे. धोनीने संघाच्या हितासाठी ते मान्य केले आहे.

Advertisement