धोनीचा अपमान करणं KKRला पडलं महागात; भडकलेल्या चाहत्यांनी गंभीरची घेतली शाळा, तर जडेजानं…भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या चाहत्यांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद भूषवणाऱ्या धोनीचा जुना फोटो कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोवरून धोनीला ट्रोल करण्यात आले. केकेआरच्या या पोस्टवर धोनीच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. एवढेच नव्हे, तर भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही असे उत्तर दिले, की तो ट्विटरवर ट्रेंड करू लागला.

Advertisement

कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी एक जुना फोटो पोस्ट करून धोनीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. धोनी आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे कर्णधारपद सांभाळत होता, तेव्हाचा हा फोटो आहे. पुण्याचा संघ आता आयपीएलचा भाग नाही. चेन्नई सुपर किंग्जला लीगमधून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले तेव्हा, पुणे फ्रेंचायझी लीगमध्ये सहभागी झाली आणि धोनीने त्याचे कर्णधारपद स्वीकारले.

केकेआरने दोन फोटोंचा कोलाज केला आहे. एक फोटो सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याचा आहे, तर दुसरा आयपीएलमधील जुन्या सामन्यातील आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सिडनी येथे सुरू असलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. सामन्याच्या पाचव्या दिवशी, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील उर्वरित दोन फलंदाजांना बाद करण्यासाठी आपले सर्व क्षेत्ररक्षक जवळ खेळपट्टीच्या जवळ घेतले होते. दुसऱ्या डावात इंग्लंडने ९ विकेट गमावल्या होत्या, पण दिवसाचा खेळ संपल्याने सामना अनिर्णित राहिला. धोनी पुण्याचे कर्णधारपद सांभाळत असताना आणि फलंदाजी करताना केकेआरने असेच क्षेत्ररक्षण सजवले होते आणि हाच फोटो केकेआरने कोलाजमध्ये घेतला.

Advertisement

धोनीच्या चाहत्यांना ही तुलना आवडली नाही आणि त्यांनी या पोस्टवर कमेंट करायला सुरुवात केली. या पोस्टवर जडेजाने आपल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्या सामन्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे, त्या सामन्यात गौतम गंभीर केकेआरचे कर्णधारपद सांभाळत होता आणि त्याने आपले सर्व क्षेत्ररक्षक धोनीच्या जवळ आणले होते. तेव्हा पीयूष चावला केकेआरसाठी गोलंदाजी करत होता कारण धोनीला लेग स्पिन खेळणे अवघड जात होते. त्यामुळे गंभीरने हा निर्णय घेतला होता.
केकेआरने लिहिले, ”एक क्षण जो तुम्हाला कसोटी क्रिकेटचा क्लासिक बनण्यापासून टी-२० क्रिकेटच्या मास्टर स्ट्रोकची आठवण करून देतो.” जडेजाने उत्तरात लिहिले, ”हा मास्टर स्ट्रोक नव्हता, फक्त एक शो ऑफ होता.”

यावर कमेंट करताना एका युजरने धोनीचा आयपीएल ट्रॉफी हातात घेतलेला फोटो पोस्ट केला. त्याच वेळी, आणखी एका यूजरने धोनीचा एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो केकेआरविरुद्ध मोठा शॉट खेळताना दिसत आहे. आणखी एका युजरने गंभीरचा वैयक्तिक स्कोअर ‘०’ दाखवत असलेला फोटोही पोस्ट केला आहे.

Advertisement

हेही वाचा – Novak Djokovic: नोव्हाक जोकोव्हिचने खटला जिंकला, ऑस्ट्रेलिया सरकारला मोठा झटका; सर्व सामान परत करण्याचा आदेश

धोनीच्या नेतृत्वाखाली, चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे आणि लीगमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यापेक्षा जास्त वेळा फक्त मुंबई इंडियन्सने पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे. धोनीने या लीगमध्ये २२० सामने खेळले असून एकूण ४७४६ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर २३ अर्धशतके आहेत.

Advertisement

The post धोनीचा अपमान करणं KKRला पडलं महागात; भडकलेल्या चाहत्यांनी गंभीरची घेतली शाळा, तर जडेजानं… appeared first on Loksatta.

Source link

Advertisement