धीरेंद्र कृष्ण महाराजांना नागपूर पोलिसांची ‘क्लीन चिट: गुन्हा दाखल होऊ शकत नसल्याची आयुक्तांची माहिती


नागपूर5 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी नागपुरात आयोजित केलेल्या दिव्य दरबारात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 अन्वये गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना सांगितले आहे. यासंदर्भात ड्रग अ‍ॅण्ड रेमेडीज कायदा या अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असेही पोलिस आयुक्त म्हणाले.

Advertisement

नागपूरच्या रेशीम बाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राम कथा या कार्यक्रमात दिव्य दरबारातील धीरेंद्र कृष्ण महाराज यांचे भाषण पोलिसांनी तपासले असेही पोलिस आयुक्त म्हणाले. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे सहा तासाच्या भाषणाच्या रेकॉर्डिंग नागपूर पोलिसांनी तपासले आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भाषणात कुठल्याही पद्धतीने आक्षेपार्ह गोष्ट आढळली नसल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

7 आणि 8 जानेवारी रोजी झालेल्या दिव्य दरबाराच्या व्हिडिओची तपासणी केली. दोन्ही मिळून सहा तासांचे व्हिडीओ होते. त्यात अंधश्रद्धेसारखे काही आढळले नाही. महाराज नागपूरला येण्यापूर्वी आणि येथून निघून गेल्या नंतरचे व्हिडिओ आम्ही ग्राह्य धरले नाही. अंधश्रद्धा पसरवण्यासारखे काही आढळले नाही. पोलिस कोणत्याही दबावात नाही असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. आमच्या निर्णया विरोधात श्याम मानव न्यायालयात जाऊ शकतात.

Advertisement

श्याम मानव यांना दाभोळकर करण्याची धमकी, पोलिसांनी वाढवली सुरक्षा

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या विरुद्ध बोलणे थांबवले नाही तर तुमचा नरेंद्र दाभोळकर करू’ अशी धमकी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना श्याम मानव यांनी दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिल्यानंतर दोघांतील संघर्ष तीव्र झाला आहे.

Advertisement

हिंदुत्ववादी संघटनांनीसुद्धा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना पाठिंबा दिला आहे. श्याम मानव यांच्या जीविताला कुठलाही धोका उद्भवू नये, या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या ‘प्रेत दरबार’ आणि ‘दिव्य दरबार’वर आक्षेप घेऊन अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे. दिव्यशक्ती आणि चमत्कार सिद्ध करून दाखवल्यास 30 लाखांचे बक्षीस देण्याचे आव्हानही श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांना दिले होते. श्याम मानव यांनी थेट शास्त्री यांच्या दिव्यशक्तीला आव्हान देत राज्यात जादूटोणा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप मानव यांनी केला.

Advertisement

नागपूरमध्ये येऊन तुमची दिव्यशक्ती सिद्ध करा, असे आव्हान श्याम मानव यांनी दिले होते. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी रायपूरमध्ये आव्हान स्वीकारून श्याम मानव यांना रायपूरला येण्यास सांगितले होते. धीरेंद्र शास्त्री आणि श्याम मानव यांच्यातील वाद वाढत जात असतानाच श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर एक धमकीचा मेसेज आला.

त्यामध्ये ‘तुम्ही धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध बोलणे थांबवा, अन्यथा तुमचा नरेंद्र दाभोळकर करू,’ अशी धमकी दिली. धमकी मिळताच त्यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली. सदरचे ठाणेदार विनोद चौधरी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली. विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी लगेच श्याम मानव यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. त्यांच्यासोबत आणखी चार सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. रविभवन येथेही सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement