धमकीचे सत्र सुरूच: सलमान खानला लॉरेन्स-गोल्डीच्या नावाने इमेलद्वारे धमकी, FIR दाखल; लॉरेन्स म्हणाला होता – सुरक्षा हटताच त्याला मारेन


मुंबई20 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

बाॅलिवूड स्टार सलमान खानला ईमेलद्वारे धमक्या आल्या आहेत. रोहित नावाच्या व्यक्तीने लॉरेन्स आणि गोल्ड ब्रार यांच्या नावाने धमकीचे ईमेल पाठवले आहेत. ईमेल सलमानच्या टीमला मिळाला असून तो प्राप्त होताच सलमानच्या मॅनेजरने वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे.

Advertisement

पुढच्यावेळी थेट झटका बसेल

रोहित नामक व्यक्तीने इमेलमध्ये नमूद केले की, ”भाऊ, मला तुमचा बॉस सलमानशी बोलायचे आहे. आता वेळ असल्याने हे सांगतोय. पुढच्या वेळी थेट झटका बसेल.” तत्पूर्वी एका टीव्ही मुलाखतीत लॉरेन्सने सलमानला धमकी दिली होती.

Advertisement

दोन दिवसांपूर्वी लाॅरेन्स बिष्णोईची धमकी

दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेन्स म्हणाला होता- ज्या दिवशी सलमानची सुरक्षा हटवली जाईल, तो दिवस सलमानच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल, असे तो म्हणाला होता.

Advertisement

सलमानला मारण्याचा लाॅरेन्सचा लहानपणापासून मनसुबा

सलमान खानचा अहंकार रावणापेक्षा जास्त असल्याचे लॉरेन्स म्हणाला. सिद्धू मूसेवालाही तितकाच अहंकारी होता. लहानपणापासून माझे एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे सलमान खानला मारणे. मी चार-पाच वर्षांचा असताना सलमानने काळवीट मारले होते. बिष्णोई समाजाचे लोक काळविटाची (हरणाची) पूजा करतात. आपल्या गुन्ह्याबद्दल सलमानने आपल्या समाजाची माफीही मागितलेली नाही. मला लहानपणापासूनच त्याचा राग आहे.लॉरेन्सने दोन दिवसांपूर्वी तुरुंगात असताना एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यानंतरही त्याने सलमानला धमकी दिली होती.

Advertisement

लॉरेन्स म्हणाला – सलमानचा अहंकार तोडेल

लॉरेन्स बिश्नोई पुढे म्हणाले की, सलमानने आपल्या समाजाला खूप कमी दाखवले आहे. त्यांचा अहंकार आम्ही मोडून काढू. त्याला स्वतःला वाचवायचे असेल तर समाजासमोर येऊन माफी मागावी. त्यासाठी त्यांना राजस्थानमधील बिष्णोई समाजाच्या ‘जंबेश्वर जी’ मंदिरात यावे. समाजातील लोकांनी त्याला माफ केले तर मला काहीच हरकत नाही.

Advertisement

गेल्या वर्षी सलमानला धमकीचे पत्र

लॉरेन्स बिश्नोई यांच्याकडून धमकी मिळाल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्याला महाराष्ट्र सरकारकडून Y+ श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. जून 2022 मध्ये सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते, ज्यामध्ये सिद्धू मूसवालाचे जे झाले, तेच सलमानचेही होईल, असे लिहिले होते.

Advertisement

धमकीनंतर Y+ सुरक्षा, 11 जवान सावलीसारखे सोबत

लाॅरेन्स बिष्णोईच्या धमकीआधी महाराष्ट्र पोलीस कर्मचारी सलमानजवळ राहत असत पण, बिष्णोईच्या धमक्या आल्यानंतर त्याला Y+ श्रेणीची सुरक्षा मिळाली. या सुरक्षा वर्तुळात 11 जवान नेहमीच सलमानसोबत राहतात, त्यात एक किंवा दोन कमांडो आणि 2 पीएसओचाही समावेश आहे. सलमानच्या गाडीला पुढे आणि मागे दोन वाहने नेहमीच असतात. यासोबतच सलमानची कारही पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे.

Advertisement

यामुळे सलमानला झाला होता तुरुंगवास

रिपोर्ट्सनुसार, 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने राजस्थानच्या जंगलात काळवीटाची शिकार केली होती. सलमानशिवाय सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम कोठारी यांनाही आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर बिश्नोई समाजानेही सलमानविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सलमानला जोधपूर कोर्टाने पाच वर्षांची शिक्षाही सुनावली होती, मात्र नंतर त्याला या प्रकरणात जामीन मिळाला होता.

Advertisement

कोण आहे लॉरेन्स बिश्वोई

लॉरेन्स बिश्वोई हा पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातील सर्वात धोकादायक टोळ्यांचा म्होरक्या आहे. तो तुरुंगातून आपली टोळी चालवतो. त्याच्याकडे महागड्या पिस्तूल आणि बंदुकांचा साठाही आहे. 15 वर्षांपूर्वी आपल्या कॉलेजमध्ये हवेत गोळीबार करून त्याने आपला दर्जा प्रस्थापित केला आहे. लॉरेन्स सामान्यत: तुरुंगात परदेशी सिम वापरून व्हॉट्सअ‌ॅपद्वारे सर्व संदेश पाठवतो. त्यांचे वडील लविंद्र कुमार यांनी पंजाब पोलिसांत कॉन्स्टेबल पदावर काम केले आहे. तो सर्वप्रथम सलमान खानला उडवून देण्याची धमकी देऊन प्रसिद्धीझोतात आला होता. तो 2014 पासून तुरुंगात आहे.

Advertisement

मुसेवाला हत्येप्रकरणी कट रचल्याचा आरोप

मुसेवाला हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने म्हटले आहे की, लॉरेन्सनेच हा कट रचला होता, जो कॅनडात बसून गुंड गोल्डी ब्रार आणि सचिन थापन यांनी राबवला होता. मोहालीत आपला जवळचा अकाली नेता विक्की मिद्दुखेडा यांच्या हत्येचा राग आल्याचे स्वतः लॉरेन्सने म्हटले आहे. लॉरेन्सच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांनी विक्की मिड्दुखेडाची हत्या केली ते सिद्धू मुसेवालाचे जवळचे होते. लॉरेन्सने तिहार तुरुंगातही मूसवाला जिवंत सोडणार नाही अशी शपथ घेतली होती.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement