बीड11 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
धनंजय मुंडे म्हणाले की, मला अनेक जणांनी विचारलं, बीड जिल्ह्यातील मातीतली सभा 17 तारखेला झालेल्या सभेला उत्तर आहे का, मी नम्रपणे सांगितले की, आजची ही सभा 17 तारखेच्या सभेला उत्तर नाही तर बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या उत्तरदायित्वाची ही सभा आहे. जनतेच्या सेवेच्या माध्यमातून उत्तरदायित्वाची सभा आहे. अस्मितेची, सन्मानाची, बीड जिल्ह्यातील दुष्काळ संपविण्याची ही सभा आहे.
साहेबांच्या व्यासपिठावर पुरोगामी संस्कार राहिला नाही
पुरोगामी विचार संस्कार त्या साहेबांच्या व्यासपिठावर दिसले नाही. शब्दाचा पक्का म्हणून महाराष्ट्राला माहित नाही. त्यांना लबाड म्हणत असेल तर ते राष्ट्रवादीचे संस्कार नाहीत. हा पुरोगामी विचार आता उत्तरदायित्व म्हणून अजित दादा चालवत आहेत.
धनंजय मुंडे म्हणाले की, अजित दादा तुम्हाला मागण्या करण्याआधी आभार व्यक्त करतो. स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ निघाली. पण तुम्ही त्या महामंडळाला अर्थसंकल्पात निधी मंजूर केला. ऊसतोड कामगारांसाठी निधी दिला आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्याचे असंख्य प्रश्न तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊ व अनेकांच्या शब्दाला मान देऊन तुम्ही मार्गी लावली आहेत.आमच्या मागण्या तुम्ही मान्य केल्या. आता त्यासाठी थोडी तिजोरी आमच्यासाठी मोठी करावी, ही विनंती केली. आम्ही काम करत राहणार, उत्तरदायित्व पार पाडत राहणार.
माझा इतिहास विचारला गेला,
धनंजय मुंडे म्हणाले की, 17 तारखेच्या पूर्वसंध्येला माझ्यावरती माझा इतिहास विचारला गेला. या जिल्ह्यातल्या लोकांना माझा इतिहास माहित आहे. मग देवाने अन् दैवताने आज्ञा केली तर तर त्याचे पालन करावे हे सर्वांना माहित आहे की नाही. म्हणून मी सांगतो की, माझा इतिहास हा संघर्षाचा आहे. 2010 मध्ये भाजपमधून काढले. तेव्हा दोन मत दिली तेव्हा मी निवडून आलो. तुमच्यासमोर धनंजय मुंडे उभा आहे त्याचामागे अजित दादांची साथ होती. मी स्व. गोपिनाथ मुंडे साहेब यांच्या पठडीत तयार झालेलो आहे.
2014 मध्ये कठीण परिस्थितीत दादांनी मला विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता केले. त्याकाळात मी चांगले काम केले. हे मी नाही तर आपल्या सर्वांचे दैवत यांनी त्यांच्या ‘लोक माझा सांगांती’ या पुस्तकात माझ्या दैवताने लिहले की, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता म्हणून माझी कर्तबगारी चांगली राहिली आहे.
‘सवाल इस बात नही है की, शिशा बचा है क्या तुटा है, सवाल इस बात का पत्थर कहा से आया’ तुम्हाला आपला इतिहास माहित आहे. कारण मी अनेकांचे कार्यक्रम घेतले. अटलजी, अडवाणींची सभा, आज अभिमानाने सांगतो की, अजित दादांची आजची सभा रेकॉर्ड ब्रेक होती.
माझ्या पाचवीला संघर्ष पुजला
धनंजय मुंडे म्हणाले की, माझ्या पाचवीला संघर्ष पुंजला. मी मंत्री आहे तो ही कृषीमंत्री आहे. शेतमजुराचा, शेतकऱ्याचा मुलगा आहे. आता महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती आहे. पण यातून चांगले काम करेन, असा विश्वास बीड करांच्या उपस्थित दादा तुम्हाला देतो.
हे ही वाचा
बीडमध्ये शक्तीप्रदर्शन:अजित पवारांचे जंगी स्वागत; आजची सभा उत्तरसभा नव्हे, ही उत्तरदायित्व सभा- मंत्री धनंजय मुंडे
राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असे गट पाहायला मिळत आहेत. दरम्यान शरद पवारांकडून अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी बीडमध्ये शरद पवार यांची नुकतीच सभा पार पडली. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांच्याकडून बीडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. – येथे वाचा संपूर्ण बातमी