मुंबई22 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीचा 15 दिवसांपूर्वी अपघात झाला होता. वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता. आज तब्बल 15 दिवसांच्या उपचारांनंतर धनंजय मुंडे यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
3 जानेवारीला धनंजय मुंडे दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परतताना रात्री 12ः30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला होता. यात धनंजय मुंडेंच्या छातीला मार लागला होता. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मुंबईला एअरलिफ्टद्वारे मुंबईत हलवण्यात आले होते. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.
परळीला येईन
आज धनंजय मुंडे यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्टरांनी पुढील काही दिवस त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. धनंजय मुंडे आता काही दिवस मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणार असून या काळात त्यांना कोणालाही भेटता येणार नाही. मात्र लवकरच आपल्या सर्वांना भेटायला व पुन्हा जनसेवेत रुजू व्हायला परळीला येईन. असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
सर्वांचे मनापासून आभार
धनंजय मुंडे म्हणाले, मी रुग्णालयात असताना राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, पत्रकारिता सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझी काळजी व्यक्त करत विचारपूस केली. त्या सर्वांचे तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो.
पंकजा मुंडेंनी घेतली होती भेट
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी 8 दिवसांपूर्वी आपले चुलत भाऊ धनंजय मुंडे यांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. यावेळी पंकजा आणि धनंजय यांच्यात विविध विषयावर चर्चा देखील झाली.
धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. यात धनंजय मुंडेंच्या छातीला मार लागला. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मुंबईला एअरलिफ्टद्वारे मुंबईत हलवले आहे. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर