धनंजय मुंडेंनी लेकीला सांगितले प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व: VIDEO होतोय तुफान व्हायरल


मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आज भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रजासत्ताकच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आपल्या लेकीला प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत असून लोकांकडून या व्हिडिओला पसंती मिळत आहे.

Advertisement

धनंजय मुंडे यांच्या गाडीचा 15 दिवसांपूर्वी अपघात झाला होता. वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता. सध्या ते त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आराम करत आहेत. मात्र या मिळालेल्या वेळेचा ते चांगलाच सदुपयोग करत असून आपल्या राजकीय धावपळीत कुटुंबाला देता येत नसलेल्या वेळेची कसर भरुन काढत आहेत.

प्रजासत्ताक दिवस नेमका का साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन साजरा करायला सुरुवात होण्यापूर्वी काय घडले होते, याची पार्श्वभूमी धनंजय मुंडे यांनी आपल्या मुलीला समजावून सांगितली. याचा एक व्हिडिओ स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

Advertisement

काय म्हटलेय ट्विटमध्ये?

धनंजय मुंडे यांचे ट्विट.

Advertisement

धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर व्हिडिओसोबत कॅप्शन दिले आहे. यात त्यांनी लिहिले आहे, ‘अपघातामुळे सध्या घरी विश्रांती घेत असताना माझी मुलगी आदीश्रीसोबत गप्पा मारायला वेळ मिळतो आहे. प्रजासत्ताक दिनाबद्दलच्या तिच्या प्रश्नाचे समाधान केले. राजकीय व सामाजिक कार्याच्या गडबडीतील आयुष्यात असे क्षण आनंद देऊन जातात’.

व्हिडिओत काय सांगतात?

Advertisement

धनंजय मुंडे आपली मुलगी आदीश्रीला या व्हिडिओत सांगत आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशातली कॉन्सिट्यूशन अर्थात घटना नोव्हेंबर महिन्यात बनवली. मग ती सरकारने स्वीकारली. 26 जानेवारीपासून घटना आपल्या देशात अंमलबजावणी करायला सुरुवात झाली. त्यामुळे तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तुला समजले ना असे म्हणतच त्यांनी आपल्या मुलीचे लाड केले.

काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात

Advertisement

3 जानेवारीला धनंजय मुंडे दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परतताना रात्री 12ः30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला होता. यात धनंजय मुंडेंच्या छातीला मार लागला होता. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मुंबईला एअरलिफ्टद्वारे मुंबईत हलवण्यात आले होते. त्यांच्यावर ​​​​​ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.

संबंधित वृत्त

Advertisement

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीचा 15 दिवसांपूर्वी अपघात झाला होता. वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. वाचा सविस्तर

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement