धक्कादायक: राजस्थानच्या जयपुरमध्ये एका विवाहित तरुणीची प्रियकरासोबत गळफास घेत आत्महत्या; सहा महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह


  • Marathi News
  • National
  • Suicide Sikar Jaipur Rajasthan | Marathi News | Rajasthan Update | 6 Months Ago In Jaipur, The Girl Got Married To Someone Else, Came To Her Maternal Home, Ran Away From Home

Advertisement

2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एका विवाहित तरुणीने आपल्या प्रियकरासोबत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या जयपुरमध्ये घडली आहे. सदरील आत्महत्या केलेल्या तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या पहिल्या रात्रीच सदरील तरुणीने नवऱ्याच्या पळ काढला होता. त्यानंतर सदरील तरुणीने आणि तिच्या प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

Advertisement

आत्महत्या केलेल्या दोघा जोडप्याचे नाव लोकेश (19) आणि सपना (19) असे आहे. त्यांनी शनिवारी रात्री एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या जोडप्याने आत्महत्या करण्यापुर्वी व्हॉट्सअॅपवर आपली लोकेशन शेअर केली होती. त्याच्या आधारेच कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

दोन वर्षांपासून सुरू होता प्रेमसंबध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपुरच्या जोडप्याने आत्महत्या केली असून, त्याचे नाव लोकेश आणि सपना आहे. या दोघांचे वय 19 वर्ष होते. या दोघांत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबध सुरू होते. शनिवारी या जोडप्याने फतेहपुर सालासर महामार्गावरील रॉयल हॉटेलच्या समोर असलेल्या एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी शनिवारी संध्याकाळी सहा वाजेदरम्यान व्हॉट्सअॅपवर लोकेशन शेअर केली होती. लोकेशनचा पाठलाग करुनच कुटुंबियांनी धाव घेतली असता, तिथे त्यांना मृतहेद लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले.

Advertisement

सहा महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

शनिवारी आत्महत्या केल्यानंतर मृत सपनाच्या वडिलांनी पोलिसांनी रात्री फोन करुन घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, मृतदेह फासावरुन खाली काढले. लोकेश आणि सपना या दोघांच्या मृतदेहाला सध्या शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वीच सपना हिचे लग्न झाले होते.

Advertisement

ती काही दिवसांपासून आपल्या माहेरी आली होती. शुक्रवारी कुटुंबातील सर्व झोपल्यानंतर या दोघांनी घरातून पळ काढला होता. दोघांच्याही घरच्यांनी त्यांना शोधण्याचा खुप प्रयत्न केला मात्र, त्यानंतर काही तासातच त्या दोघांनीही आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या या जोडप्याकडे कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडलेली नाही.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement