धक्कादायक: निवृत्त परिचारिकेने राहत्या घरी घेतला गळफास; इमारतीवरून उडी घेत तरुणाची आत्महत्या


पुणे2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

तळेगाव दाभाडे परिसरातील पंचवटी काॅलनीत सेवानिवृत्त परिचारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

Advertisement

भारती दत्तू हिंगणे-सोनवणे (वय ५६, रा. पंचवटी काॅलनी, तळेगाव दाभाडे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. भारती हिंगणे तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका होत्या. त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. शुक्रवारी (१७ मार्च) दुपारी हिंगणे यांनी राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.हिंगणे यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. तळेगाव दाभाडे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

इमारतीवरून उडी मारुन तरुणीची आत्महत्या, दोघांविरुद्ध गुन्हा

Advertisement

पिंपरीत वाग्दत्त पतीची आत्महत्या कल्याणीनगरमध्ये इमारतीवरुन उडी मारुन तरुणीने केलेल्या आत्महत्येनंतर तिच्या वाग्दत्त पतीनेही आत्महत्या केल्याची घटना पिंपपरीतील खराळवाडीत घडली आहे. दरम्यान, तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अस्मिता परशुराम धोत्रे (रा. खराळवाडी, पिपंरी.) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना दि.१४ मार्चला येरवड्यातील कल्याणीनगरमध्ये घडली होती. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सुरवातीला अकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र , नातेवाईकांनी मुलीचा मृतदेह थेट येरवडा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Advertisement

अस्मिता पिंपरीतील खराळवाडीत राहायला असून तिचे एका तरुणासोबत लग्न ठरविण्यात आले होते. पुढील महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. दरम्यान, १४ मार्चला अस्मिता कल्याणीनगरमध्ये मित्रांना भेटायला आली होती. त्यावेळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, अस्मिताच्या नातलगांनी तिचा मृतदेह पोलिस ठाण्यात आणला. त्यानुसार तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, होणार्‍या पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे वाग्दत्त पती जयने देखील आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement