छत्रपती संभाजीनगर12 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
छत्रपती संभाजीनगरातील वळदगावमध्ये एकाच कुटूंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती – पत्नी आणि चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. मोहन प्रताप डांगर ( 28 ) , पुजा मोहन डांगर ( 24 ) आणि श्रेया ( 4 ) अशी मृतांची नावे आहेत.
सातारा पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वळदगावमध्ये उपसरपंच संजय झळके यांच्या घरी डांगर कुटुंब भाड्याने राहत होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्री या दामपत्त्यामध्ये भांडण झाले. शनंतर यांनी प्रथम मुलीला गळफास देऊननंतर पती पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आज सकाळी घटना उघडकीस आली असून सातारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत पोद्दार यांनी सांगितले की या घटनेची माहिती डांगर यांच्या कुटुंबियांना देण्यात आली असून ते आल्यानंतरच नेमका काय वाद होता हे समोर येईल. तर घरगुती वादातून हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हे ही वृत्त वाचा
‘सुसाईड पॉइंट’:प्रेम विवाहाला वर्ष होण्यापूर्वीच दाम्पत्याने केली आत्महत्या, नातेवाइकाची दुचाकी घेऊन गेले, ते परतलेच नाहीत
अचलपूर तालुक्यातील वझ्झर गावानजीक असणाऱ्या सापन धरणाच्या जलक्षेत्रात गुरुवारी सकाळी एका महिलेसह पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी चौकशी केली असता ते मृतदेह चिचखेडा (ता. िचखलदरा) येथील नवदांपत्याचे असल्याचे स्पष्ट झाले.
विक्की मंगलदास बारवे (वय 24) व तुलसी विक्की बारवे (वय 21) अशी त्यांची नावे आहेत. अकरा महिन्यांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या या दाम्पत्याने प्रेमविवाह केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता एक दुचाकी आढळली. सदर दुचाकी विक्कीने त्याच्या नातेवाइकाकडून मंगळवारी दुपारी घेतल्याचे तपासात उघड झाले. वाचा सविस्तर