धक्कादायक: एकाच कुटुंबातील तिघांची विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू


पुणे11 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

हडपसर येथे एकाच कुटुंबातील तिघांनी विषारी औषध प्राशन केले. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून, दोघांवर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे ( वय -७०) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

Advertisement

हडपसर परिसरात फुरसुंगी येथे लक्ष्मी निवास, भोसले व्हिलेज येथे सूर्यप्रकाश अबनावे यांचे कुटुंब राहण्यास आहे. सोमवारी अबनावे कुटुंब घरी असताना अज्ञात कारणावरून त्यांचे राहते घरी आतून दरवाजा बंद करून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (70 वर्षे), जनाबाई सूर्याप्रकाश अबनावे (60 वर्षे), चेतन सूर्यप्रकाश अबनावे (41 वर्षे) अशी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची नावे आहे. त्यापैकी सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि मुलगा यांना पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेले आहे.

Advertisement

पोलिसांना याबाबत माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस दाखल होत मृत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविचछेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. तर दोघांना पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.याबाबत हडपसर पोलीस पुढील तपास करत आहे.



Source link

Advertisement