द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात: पगासाराठी तीन महिने ‘वेट अँड वॉच’; 15 दिवसांत पैसे देण्यासाठी देविदास पिंगळेंचे राज्य शासनाला पत्र


नाशिकएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

द्राक्षांची निर्यातदारांना विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना सात दिवसात पैसे मिळायला हवे, परंतू निर्यातदार मात्र तीन महिन्याने शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे देतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना कृषी निविष्ठांसह इतर उधार उसनवारी देण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे निर्यातदारांनी शेतकऱ्यांना पंधरा दिवसात सर्व पैसे द्यावे यासाठी माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी पुढाकार घेवून द्राक्ष बागायतदार संघाला पत्र दिले आहे. तसेच ते राज्य शासनाकडे देखील यासाठी पाठपुरावा करणार आहे.

Advertisement

जगातील विविध देशामध्ये महाराष्ट्रातील द्राक्षांना मागणी असते, परदेशी मागणीनुसार राज्यातील शेतकरी द्राक्ष उत्पादन घेत असतात. परदेशी शासनाच्या अर्टी शर्तीनुसार द्राक्षामध्ये साखरेचे प्रमाण ठेवतात. त्यानुसार निर्यातदार हे द्राक्षांची खरेदी विक्री करतात. परंतू निर्यातदारांनी द्राक्ष बागेतून नेल्यानंतर त्यांना पंधरा दिवसात सर्व पैसे देण्याची आवश्यकता आहे. निर्यातदार हे तीन महिन्यांनी पैसे देत असल्याने शेतकऱ्यांना पैशांसाठी विनवणी करावी लागते.

यासाठी माजी खासदार देविदास पिंगळे यांनी निर्यातदारांच्या व्यवहाराबाबत आवाज उठविला असुन त्याविरोधात द्राक्ष बागाईतदार संघासोबत पत्रव्यवहार केला आहे. तसेच राज्य शासनाकडे देखील याबाबत पत्रव्यवहार करणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष ही युरोपातील नेदरलँड, जर्मनी, बेल्जीयम, युके आणि डेन्मार्क येथे मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. तसेच रशिया, इंग्लड, कॅनडा, तर्की आणि चीन या देशांमध्ये द्राक्षाची निर्यात होते.

Advertisement

कोरोना काळात द्राक्षाला मागणी नव्हती, त्यानंतर बेमोसमी पावसाने सलग दोन वर्षे द्राक्ष पीक हातातून गेले होते. त्यामुळे सलग तीन वर्षे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मात्र, यंदाच्या वर्षी नुकसान कमी झाल्याने द्राक्ष पीक चांगल्या स्थितीत आहे.

यंदाच्या वर्षी थंडीचाही काही फारसा फटका बसलेला नाही. द्राक्षाची लागवडही यंदाच्या वर्षी अधिक आहे, त्यामुळे उत्पादन वाढ होणार आहे. परिणामी निर्यात ही वाढणार आहे परंतू, निर्यात केलेल्या द्राक्षांची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्याना तब्बल तीन महिने वाट पाहावी लागत आहे. याबाबत जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पिंगळे यांचे कडे समस्या मांडली आहे.

Advertisement

कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे द्राक्ष निर्यातीत घट झाली होती. या वर्षी द्राक्ष उत्पादन चांगले असुन निर्यात वाढणार आहे. मात्र पैसे येण्यासाठी तीन प्रतिक्षा करावी लागते. यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मालाचे पैसे पंधरा दिवसांत मिळतील यासाठी प्रयत्न करावे.

– देविदास पिंगळे, माजी खासदार तथा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement