दोलायमान सामन्यात चहलचा पंजा आणि बटलरचे शतक यांच्या जोरावर राजस्थानने सामना घातला खिशात

दोलायमान सामन्यात चहलचा पंजा आणि बटलरचे शतक यांच्या जोरावर राजस्थानने सामना घातला खिशात
दोलायमान सामन्यात चहलचा पंजा आणि बटलरचे शतक यांच्या जोरावर राजस्थानने सामना घातला खिशात

ब्रेबॉर्नवर झालेल्या हाय स्कोरिंग सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने राजस्थानचे २१७ धावांचे अवाढव्य आव्हान पार करण्यासाठी जीवाचे राण केले. अखेर त्याच्या झुंजार वृत्तीवर उमेश यादव यशाची मोहर उमटवणार असे वाटत होते. मात्र राजस्थानच्या मॅकॉयने अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज असताना फक्त ३ धावा देत दोन विकेट घेतल्या आणि सामना संपवला. राजस्थानने सामना ८ धावांनी जिंकला.

कोलकाताच्या कर्णधाराचे अर्धशतक व्यर्थ

कोलकाताकडून फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार खेळी केली. त्याने ५१ चेंडूंचा सामना करताना ८५ धावा केल्या. यामध्ये ४ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. मात्र, त्याचे हे अर्धशतक व्यर्थ ठरलं. श्रेयसव्यतिरिक्त सलामीवीर ऍरॉन फिंचनेही अर्धशतकी खेळी केली. त्याने २८ चेंडूंचा सामना करताना ५८ धावा चोपल्या. यामध्ये २ षटकार आणि ९ चौकारही सामील आहेत. याव्यतिरिक्त उमेश यादवने २१ धावांचे योगदान दिले. यादव सामना जिंकवेल असे वाटत होते. मात्र, संघाला सामना जिंकून देण्यात तो अपयशी ठरला. तसेच, नितीश राणाने १८ धावांचे योगदान दिले होते.

Advertisement

एका बाजूने विकेट पडत असताना, केकेआरची अवस्था ८ बाद १८० झाली असताना उमेश यादव आणि शेल्डन जॅक्सन यांनी झुंजार वृत्ती दाखवली. उमेश यादवने १८ वे षटक टाकणाऱ्या बोल्टला दोन षटकार आणि एक चौकार मारत २० धावा चोपून काढल्या. युझवेंद्र चहलने धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या केकेआरला पाठोपाठ धक्के दिले. त्याने आपल्या ४ षटकात ४० धावा देत ५ विकेट घेतल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने श्रेयस अय्यर (८५), नितीश राणा (१८), व्यंकटेश अय्यर(६), शिवम मावी (०) आणि पॅट कमिन्सला (०) बाद केले.

पहिल्याच चेंडूवर विकेट गेल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या अॅरोन फिंच आणि श्रेयस अय्यरने धडाकेबाज फलंदाजी केली. या दोघांनी ९ व्या षटकातच केकेआरचे शतक धावफलकावर लावले. राजस्थानच्या २१८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला होता . सलामीला आलेला सुनिल नारायण धावबाद झाला.

Advertisement

या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्राथमिकरीत्या राजस्थानच्या फलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. राजस्थानने पावरप्लेचा पुरेपूर फायदा उचलला आणि पहिल्या ६ षटकात ६० धावा जोडल्या. सलामीवीर जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कलने ताबडतोब फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी रचली. पुढे बटलरने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. यावेली त्याने अवघ्या ६१ चेंडूत १०३ धावांची आतिषी खेळी केली. यामध्ये ५ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता. बटलरच्या १०३ धावांमुळे राजस्थानने कोलकाताला २१८ धावांचे आव्हान दिले.

बनवला हा खास विक्रम

Advertisement

बटलरचे हे या हंगामातील दुसरे शतक होते. विशेष म्हणजे, या शतकासह त्याने खास कामगिरी केली. तो राजस्थानकडून सर्वाधिक शतके मारणारा खेळाडू ठरला. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ३ शतके मारली आहेत. राजस्थानकडून सर्वाधिक शतके मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन आणि शेन वॉटसन संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहेत. रहाणे, सॅमसन आणि वॉटसन यांनी राजस्थानकडून खेळताना प्रत्येकी २ शतके मारली आहेत.

Advertisement