सोलापूर2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
नूर ए दरिया मस्जिद जवळील , जुना विडी घरकुल परिसरात दगडफेक करून गोंधळ घातल्याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रेम पुला, व्यंकटेश मुशन, विनायक गवळी, ओंकार नराल, नीरज भीमनपल्ली, अक्षय अन्नम, सोन्या वग्गू, महेश कोडम, विशाल घाडगे, विशाल चंदनशिवे, आयान (पूर्ण नाव नाही), लुकमान बागवान, नोमान बागवान, सुफियान बागवान, इमरान चुडगुंपी, शाहीद बागवान, माज पेरमपल्ली, अंपाल (पूर्ण नाव नोंद नाही) व इतर अनोळखी आठ तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
हवालदार सुभाष चव्हाण यांनी एमआयडीसी पोलिसात ७ मार्च रोजी रात्री सव्वाअकरा वाजता फिर्याद दिली. हा प्रकार ६ मार्च रोजी रात्री दहा वाजता घडला होता. सर्वजण मिळून जमाबंदीचे आदेश उल्लंघन करून दोन जमाव जमवून हाणामारी करत एकमेकांवर दगडफेक केली. गोंधळ घातल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तपास फौजदार अनिल वळसंगे करत आहेत.